BCCI ची मोठी कारवाई! गौतम गंभीरच्या निकटवर्तीयाला दाखवला घरचा रस्ता; कारणही धक्कादायक

BCCI ची मोठी कारवाई! गौतम गंभीरच्या निकटवर्तीयाला दाखवला घरचा रस्ता; कारणही धक्कादायक

Indian Cricket Team Supporting Staff : यावर्षात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाचा (Team India) पराभव आणि या सिरीजदरम्यान ड्रेसिंग रुममधील गोष्टी लीक झाल्याप्रकरणी बीसीसीआयने कठोर (BCCI) कारवाई केली आहे. बीसीसीईआयचे सहायक कोच अभिषेक नायरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अभिषेक नायरचा कार्यकाळ सुरू होऊन आठ महिनेच झाले होते. मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने (Border Gavaskar Trophy) एक आढावा बैठक घेतली होती. यात संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने तक्रार केली होती की ड्रेसिंग रुममधील गोष्टी बाहेर जात आहेत.

दैनिक जागरणमधील वृत्तानुसार सहायक कोच अभिषेक नायरबरोबरच फिल्डिंग कोच टी. दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांचीही सुट्टी करण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की नायरच्या जागी कुणाचीही नियुक्ती केली जाणार नाही. तर फिल्डिंग कोच टी दिलीप यांचे काम आता सहायक कोच रेयान टेन डेस्काटे पाहतील. ट्रेनर सोहम देसाईच्या जागी एड्रियन लि रु असतील. त्यांनी बीसीसीआय बरोबर एक करार केला आहे.

टीम इंडिया तीन महिने फुल पॅक, मायदेशात ‘या’ संघांना देणार टक्कर; सामन्यांचे शेड्युल जारी

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत वाद

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाला 1-3 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. या सिरीजमध्ये फिरकी गोलंदाज आर. अश्विनने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. रोहित शर्मानेही सिडनी कसोटीतून अंग काढून घेतले होते. यानंतर भारतीय संघात काहीतरी धुसफूस सुरू आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. भारतीय ड्रेसिंग रुममधील गोष्टी बाहेर आल्या होत्या. एका सदस्याने या प्रकाराची तक्रार बीसीसीआयकडे केली होती. याआधी टीम इंडियाला भारतातच न्यूझीलंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडने भारतीय संघाचा कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव केला होता.

टीम इंडिया तीन महिने फुल पॅक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या आगामी सामन्यांचे वेळापत्रक (Team India Schedule) जाहीर केले आहे. या वर्षात भारतीय संघाला मायदेशात वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या (South Africa) संघाबरोबर मुकाबला करायचा आहे. या दोन्ही स्पर्धांचे शेड्युल कसे असेल याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात वेस्टइंडिज संघ भारताच्या दौऱ्यावर येईल. सन 2018 नंतर पहिल्यांदाच वेस्टइंडिज भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे.

मोठी बातमी : चॅम्पियन्स बनलेल्या टीम इंडियासाठी BCCI नं उघडली तिजोरी; जाहीर केलं 58 कोटींचं बक्षीस

follow us
  • fb
  • instagram
  • youtube