Download App

Duleep Trophy 2024: कर्णधार अभिमन्यू ईश्वरने संकटातून संघाला बाहेर काढले; शानदार शतक झळकविले

Abhimanyu Easwaran: भारत क संघाचा कर्णधार व सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने शानदार शतक झळकवित संघाला तारले आहे. ईश्वरन हा 143 धावांवर खेळत आहे.

  • Written By: Last Updated:

Abhimanyu Easwaran Hundred aganist India C Team : दुलिप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy 2024) भारत ब (India B) संघाचा भारत क (India C) संघासमोर संघर्ष सुरू आहे. भारत ब संघाच्या एका बाजूने धडाधड विकेट पडल्या पण कर्णधार व सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने (Abhimanyu Easwaran) शानदार शतक झळकवित संघाला तारले आहे. ईश्वरनहा 143 धावांवर खेळत आहे.

दोन समाजात भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा, अन् जनतेला…; रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार

या स्पर्धेत दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारत क संघाने सात बाद 309 धावा केल्या आहेत. भारत क संघाकडून अंशुल कंबोजने 23 षटके टाकत 66 धावा देत पाच बळी घेतले आहे. पहिल्या डावात भारत क संघाने 525 धावांचा डोंगर उभा केला आहे. भारत क संघ हा 216 धावांनी पिछाडीवर असून, फोलॉऑन वाचविण्यासाठी 66 धावांची गरज आहे. भारत क संघाने आजची सुरुवात बिनबाद 124 धावांवर पुढे केली. परंतु कंबोजने नारायण जगदीसन बाद केले. तो 70 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर एकापाठोपाठ चार फलंदाज बाद केले. अंशुल कंबोजने मुशीर खान आणि सरफराज खान या दोघांना पायचीत केले. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात शतक झळकविणारा मुशीर खान अवघ्या एका धावेवर बाद झाला. तर सरफराज खानही 16 धावांवर बाद झाला. रिंकू सिंग सहा धावांवर झेलबाद केला. तर नितीकुमार रेड्डी हा दोन धावांवर तंबूत परतला.


योगेश केदारांच्या मध्यस्थिला यश; जरांगे अन् राऊतांमधील वाद मिटला

एकावेळी मजबूत स्थितीत असलेल्या भारत ब संघाची घसरगुंडी झाली. ब संघाचे पाच फलंदाज 194 धावांवर तंबूत परतले होते. पण एका बाजूने कर्णधार ईश्वरने बाजू लावून धरली. ईश्वरनने वॉशिंग्टन सुंदरबरोबर सहाव्या गड्यासाठी 43 आणि साई किशोरबरोबर सातव्या गड्यासाठी 46 धावांची भागादारी केली. राहुल चाहरबरोबर तो मैदानात आहेत. त्यामुळे चौथी दिवशीही तो खेळपट्टीवर टिकून राहिल्यास भारत ब संघ संकटातून बाहेर पडेल. इश्वरनने 262 चेंडूंचा सामना करत 143 धावांची खेळी केली. त्यात त्याने 12 चौकार आणि एक षटकार मारला.

follow us