Download App

वर्ल्ड कपमध्ये पहिला उलटफेर, अफगाणिस्तानकडून गत विश्वविजेत्या इंग्लंडचा धुव्वा

ENG vs AFG: अफगाणिस्तानने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इंग्लंडचा पराभव करून यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात पहिला उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 285 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी तीन बळी घेतले. तर मोहम्मद नबीने दोन गडी बाद केले.

राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांच्या जादुई फिरकीमुळे अफगाणिस्तानने एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करून पहिला उलटफेर केला. अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजच्या 80 धावांच्या तुफानी खेळीमुळे 285 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 40.3 षटकांत केवळ 215 धावांत गडगडला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 61 चेंडूत 66 धावांची खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

पुण्यातील ‘त्या’ जागेशी अजित पवारांचा संबंध नाही, माजी विभागीय आयुक्तांचा खुलासा

अफगाणिस्तानने दिलेल्या 286 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जॉनी बेअरस्टो दुसऱ्याच षटकात केवळ एक धाव घेत बाद झाला. बेअरस्टोला फजलहक फारुकीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जो रूटही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. रुट 17 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 11 धावा करून बाद झाला. त्याला मुजीब उर रहमानने बोल्ड केले.

Letsupp Special : गुणरत्न सदावर्ते अन् देवेंद्र फडणवीस खरंच मित्र आहेत?

यानंतर साऱ्यांच्या नजरा डेव्हिड मलानवर होत्या, मात्र मालन अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचा फार काळ सामना करू शकला नाही. तो 39 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला. यानंतर इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या.

एकीकडे इंग्लंडचा संघ ठराविक अंतराने विकेट्स गमावत होता. दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूक सतत धावा करत होता. तो सहज चौकार मारत होता. मात्र, ब्रूकशिवाय इंग्लंडचा एकही फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकला नाही. यादरम्यान जोस बटलर 09, लियाम लिव्हिंगस्टोन 10, सॅम करन 10 आणि ख्रिस वोक्स 09 धावा करून बाद झाले.

यानंतर हॅरी ब्रूकही पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रूकने 61 चेंडूत 66 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 1 षटकार आला. सरतेशेवटी आदिल रशीदने 13 चेंडूत 22 धावा, मार्क वुडने 22 चेंडूत 18 धावा आणि रीस टोपलीने सात चेंडूत 15 धावा करत काही काळ पराभव लांबवला.

अफगाणिस्तानकडून राशिद खानने 37 धावांत तीन आणि मुजीब उर रहमानने 51 धावांत तीन बळी घेतले. तर मोहम्मद नबीने अवघ्या 16 धावांत 2 बळी घेतले. याशिवाय फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, रहमानउल्ला गुरबाजने अफगाणिस्तानसाठी फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. गुरबाजने केवळ 57 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. तर इक्रम अली खिलने 58 धावांची खेळी केली. शेवटी मुजीब उर रहमानने 16 चेंडूत 28 धावा केल्या.

Tags

follow us