ENG vs SL: श्रीलंकेने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत (ENG vs SL) इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव करत तब्बल 10 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी 2014 मध्ये श्रीलंकेने इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. तर तीन सामन्यांची ही मालिका इंग्लंडने 2-1 ने जिंकली. तिसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 219 धावांची गरज होती. जे श्रीलंकेने चौथ्या दिवशी दोन गडी गमावून पूर्ण केले.
श्रीलंकेकडून पथुम निसांकाने (Pathum Nissanka) शानदार फलंदाजी करत नाबाद शतक ठोकला. त्याने नाबाद 127 धावा केल्या तर अँजेलो मॅथ्यूजने 32 धावा करत नाबाद राहिला. दोघांमध्ये 111 धावांची भागीदारी झाली. या विजयासह श्रीलंकेने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले आहे. यापैकी एक विक्रम म्हणजे इंग्लंडमध्ये आशियाई संघाने केलेला सर्वात मोठा लक्ष्याचा पाठलाग.
इंग्लंडमध्ये 200 हून अधिक धावांचा पाठलाग करणारा श्रीलंका हा पहिला आशियाई देश ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेने 1998, 2006 आणि 2014 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकला होता. पथुम निसांकाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या कसोटी मालिकेसाठी कमिंदू मेंडिस आणि जो रूट यांना प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला.
CBI ची मोठी कारवाई, दिल्ली प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याच्या घरातून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त
या सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी कहर करत इंग्लंडचा डाव फक्त 156 धावांवर आटोपला. लाहिरू कुमाराने 7 षटकांत 21 धावा देऊन चार विकेट घेतले तर विश्वा फर्नांडोने 8 षटकांत 40 धावा देत तीन विकेट घेतले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेमी स्मिथने 67 धावांची खेळी केली.