Download App

Satwiksairaj: सात्विकसाईराजनं रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव

Satwiksairaj Rankireddy Guinness World Record : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) याने बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान स्मॅश मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) बनवत इतिहास रचला आहे. त्याने ५६५ किमी प्रतितास वेगाने जोरात शॉट मारला आहे. सात्विकने मलेशियाचा (Malaysia) खेळाडू टॅन बून हेओंगचा देखील विक्रम मोडला आहे. त्याने मे २०१३ मध्ये, हेओंगने ४९३ किमी प्रतितास वेगाने स्मॅश हिट केला होता.

तसेच सात्विक पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये चिराग शेट्टीसह खेळत असतो. सात्विकने पाठीमागच्या वेळेस चिरागसह इंडोनेशिया ओपन सुपर १ हजार जिंकले होते. महिला विभागामध्ये सर्वात वेगवान स्मॅशचा विक्रम मलेशियाच्या टेन पर्लीच्या देखील नावावर केले आहे. तिने देखील ताशी ४३८ किमी वेगाने जोराचा शॉट मारला होता.

सात्विकचा स्मॅश जपानमधील सैतामा शहरातील योनेक्स फॅक्टरी जिम्नॅशियममध्ये कनडक्ट करण्यात आला आहे. या प्रसंगी जपानच्या स्पोर्ट्स गुड्स कंपनी योनेसने दिलेल्या माहितीनुसार की, “आम्हाला हे सांगत असताना अभिमान वाटतो की, योनेक्स बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि टेन पर्ली यांनी पुरुष आणि महिला बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान स्मॅशचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत इतिहास रचला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजची दुसरी कसोटी होणार ऐतिहासिक, जाणून घ्या काय आहे कारण

जागतिक विक्रमासाठी हा प्रयत्न १४ एप्रिल २०२३ दिवशी करण्यात आला होता. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत जजेसनी नोंद करण्यात आले आहे. जपानमधील सोका येथील योनेक्स फॅक्टरी जिम्नॅशियममध्ये सात्विकने हा स्मॅश मारला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

दरम्यान सात्विकने त्याचा साथीदार चिराग शेट्टीबरोबर कोरिया ओपनची प्री क्वार्टर फायनल गाठल्याची संधी मिळाली आहे. भारतीय जोडीने थायलंडच्या सुपाक जोमकोह आणि किटिनुपोंग केद्रान या जोडीचा २१-१६, २१-१४ असा पराभव केल्याचे दिसत आहे. सात्विक-चिरागने कोरिया ओपन जिंकल्यास ही जोडी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर येणार आहे.

Tags

follow us