भारत आणि वेस्ट इंडिजची दुसरी कसोटी होणार ऐतिहासिक, जाणून घ्या काय आहे कारण
IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 20 जुलैपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना 3 दिवसात एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या कसोटीसाठी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आमनेसामने असतील.
100 व्या कसोटी सामन्यासाठी मैदानावर आमने-सामने
या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ 100 व्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचा वरचष्मा आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 30 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 23 भारताने जिंकले आहेत. तर 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
याआधी झालेल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला होता. आता 100 वा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे पाहिले तर भारतीय संघासमोर वेस्ट इंडिजचा संघ खूपच कमकुवत दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
N फॉर न्यू इंडिया, D फॉर… नरेंद्र मोदींनी सांगितला एनडीएचा फूल फॉर्म
पहिला सामना कधी खेळला गेला?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 1948 साली दिल्लीत 10 ते 14 नोव्हेंबर दरम्यान खेळला गेला होता. हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात लाला अमरनाथ टीम इंडियाचे नेतृत्व करत होते. दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथ्या कसोटीचा निकाल पहिल्यांदाच लागला. या सामन्यात वेस्ट इंडिजने एक डाव आणि 193 धावांनी विजय मिळवला. हा सामना चेन्नईत खेळला गेला.
Opposition Meeting : आता ही लढाई ‘INDIA’ विरुद्ध ‘NDA’, राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं…
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद उनाडकट, मोहम्मद सिराज,नवदीप सैनी, मुकेश कुमार.