T20 World Cup 2024 : 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु होणाऱ्या T20 World Cup 2024 साठी बीसीसीआयने (BCCI) 30 एप्रिल रोजी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) संघ निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
यातच इंग्लंडचा (England) माजी कर्णधार मायकेल वॉनने (Michael Vaughan) मोठी भविष्यवाणी करत आगामी T20 विश्वचषकासाठी टॉप-4 संघाची निवड केली आहे. आगामी T20 विश्वचषकासाठी टॉप-4 संघात वॉनने भारतीय संघाची निवड केली नसल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मायकेल वॉनने एक्स (X) वर T20 विश्वचषकासाठी टॉप-4 संघाची निवड केली आहे. मायकेल वॉननुसार आगामी T20 विश्वचषकासाठी इंग्लड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज टॉप-4 संघात असू शकते.
आगामी T20 विश्वचषकासाठी आयसीसीने सर्व संघांना त्यांचे संघ सादर करण्यासाठी 1 मे ही अंतिम मुदत दिली आहे. यामुळे बीसीसीआयने 30 एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी T20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला.
भारत या स्पर्धेत आपला पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे तर 9 जूनला पाकिस्तानशी भिडणार आहे. यानंतर यूएसए विरुद्ध 12 जून रोजी तर 15 जून रोजी भारतीय संघ कॅनडा विरुद्ध खेळणार आहे.
भारतीय संघ निवडीवर प्रश्न
बीसीसीआयने सर्वांना मोठा धक्का देत केएल राहुलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे तर रिंकू सिंगला राखीव खेळाडूमध्ये समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने रिंकू सिंगपेक्षा शिवम दुबेला प्राधान्य दिल्याने संघ निवडीवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
तर भारतीय संघाचा वेगवान आक्रमणही कमकुवत दिसत असल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. निवड समितीने संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांचा भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश केला आहे.