Download App

क्रिकेटविश्वात शोककळा, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीकचे निधन

Heath Streak Death : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे मटाबेलँड येथील फार्महाऊसवर निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या स्ट्रीकची लढाई वयाच्या 49 व्या वर्षी संपली. या दिग्गज खेळाडूच्या निधनाची माहिती स्ट्रीकची पत्नी नादिनने फेसबुक पोस्टद्वारे दिली. 23 ऑगस्ट रोजी 49 वर्षीय हिथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी समोर आली होती, परंतु त्यानंतर ती अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.

हिथ स्ट्रीकचे विक्रम आजही कायम
हिथ स्ट्रीकने झिम्बाब्वेकडून खेळताना अनेक विक्रम केले आहेत, जे आजही कायम आहेत. 100 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स आणि 200 हून अधिक एकदिवसीय विकेट घेणारा स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा एकमेव गोलंदाज म्हणून अजूनही गणला जातो. 2000 च्या दशकात त्याने झिम्बाब्वेचे कर्णधारपद भूषवले होते. या कठीण काळात बोर्ड आणि संघ यांच्यातील खराब संबंधांमुळे अनेक खेळाडूंनी संघातून माघार घेतली होती.

Jalna Maratha Protest : ‘मराठ्यांचा गळा घोटणारेच जालन्यात’; मुख्यमंत्र्यांनी चव्हाण, ठाकरेंवरच फोडलं खापर

आयपीएल मध्येही सहभाग
स्ट्रीकने 1993 ते 2005 दरम्यान 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीत 1990 धावा आणि 216 विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 2943 धावा आणि 239 बळी घेतले आहेत. 2004 मध्ये त्याने झिम्बाब्वेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

त्याने 2005 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही सहभाग घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात लायन्स (GL) यांसारख्या संघांच्या कोचिंग स्टाफचाही तो महत्त्वाचा भाग होता. हीथ स्ट्रीकने आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि झिम्बाब्वेचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे.

Video : प्रगतीपुस्तकावर बाबांच्या खोट्या सह्या करायची अमृता; ‘बाबांना माहित पडल्यानंतर त्यांनी रात्रभर…’

ICC ने 2021 मध्ये स्ट्रीकवर बंदी घातली
2021 मध्ये, आयसीसीने भ्रष्टाचार विरोधी संहितेअंतर्गत हिथ स्ट्रीकवर आठ वर्षांची बंदी घातली होती. मात्र त्याने मॅच फिक्स करण्याचे आरोप फेटाळले होते. पण त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंतर्गत माहिती उघड केल्याचे कबूल केले होते.

Tags

follow us