IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जाणार आहे. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. तर वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते.
टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज गेल्या सामन्यात काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. टीम इंडिया बेंच स्ट्रेंथ आजमावू शकते. उमरान मलिका किंवा आवेश खानला टीममध्ये संधी मिळू शकतो. उमरान किंवा आवेशला संधी मिळाल्यास मुकेश कुमार किंवा अर्शदीप सिंग यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, बॉडी बॅग घोटाळ्यातील एफआयआर ईडीने मागवली
गेल्या 3 सामन्यातील भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहिली तर त्यात काही विशेष राहिलेले नाही. कर्णधार हार्दिकने 3 सामन्यात 4 विकेट घेत 80 दिल्या आहेत. अर्शदीप सिंगने 98 धावा देत 2 बळी घेतले. मुकेश कुमारने 78 धावा देत 2 विकेट घेतल्या.
Sana Khan Murder Case : सना खान हत्येतील आरोपी जेरबंद! कशी केली हत्या? आरोपीकडून कबुली
फलंदाजी हा देखील सध्या टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. सलामीवीर शुभमन गिल आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत 3 टी-20 सामन्यात केवळ 16 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला केवळ 2 चौकार मारता आले आहे. संजू सॅमसनही काही विशेष करू शकला नाही. सॅमसनने 3 सामन्यात 19 धावा केल्या आहेत. इशान किशनने 2 सामन्यात 33 धावा केल्या आहे. त्यामुळे त्यांच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी देण्यात आली होती.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (C), संजू सॅमसन (WK), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार/उमरान मलिक