Gautam Gambhir : सध्या भारतीय संघ (Team India) T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये प्रवेश देखील केला आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक (Team India New Head Caoch) म्हणून निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयकडून (BCCI) गौतम गंभीरच्या नावाची घोषणा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. T20 विश्वचषक 2024 नंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची जबाबदारी संपणार आहे. यामुळे बीसीसीआयकडून गौतम गंभीरची भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यात करार झाला असून . 2024 च्या T20 विश्वचषकानंतर त्याच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मात्र गौतम गंभीर यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण असेल याची सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड आहे तर गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आहेत.
माहितीनुसार, राहुल द्रविड प्रमाणे गौतम गंभीर देखील स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडणार आहे. जुलै महिन्यात गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार असून त्यानंतर तो सपोर्ट स्टाफमध्ये बदल करणार आहे.
लोकसभा अध्यक्ष कोण होणार? भाजपचे वाढले टेन्शन; टीडीपीने घेतली वेगळी भूमिका
माहितीनुसार, केवळ सपोर्ट स्टाफमध्ये नाहीतर भारतीय संघात देखील काही बदल होऊ शकतात. याचा कारण म्हणजे गंभीर आक्रमण करणाऱ्या क्रिकेटला प्राधान्य देतो यामुळे भारतीय संघात काही आक्रमण प्रमाणे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात येऊ शकतो.
धक्कादायक! मित्रच बनला वैरी… डोक्यात गोळी घालून केली हत्या