गौतम गंभीरवर आरोप करणे श्रीशांतला पडले भारी, एलएलसीने पाठवली कायदेशीर नोटीस

Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) सामन्यादरम्यान दोन माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीशांत (Sreesanth) यांच्यात मैदानावर झालेल्या वादानंतर एस श्रीशांतला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यातील सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीशांत यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर श्रीशांतने गंभीरच्या विरोधात […]

Sreesanth Vs Gautam Gambhir

Sreesanth Vs Gautam Gambhir

Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) सामन्यादरम्यान दोन माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीशांत (Sreesanth) यांच्यात मैदानावर झालेल्या वादानंतर एस श्रीशांतला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यातील सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीशांत यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर श्रीशांतने गंभीरच्या विरोधात सोशल मीडियावर काही खुलासे केले होते.

गौतम गंभीरसोबतच्या या भांडणानंतर एस श्रीशांतने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले होते. यात त्याने गौतम गंभीरवर अतिशय तिखट टिप्पणी केली होती आणि सामन्यादरम्यान गंभीरने त्याला अनेक वेळा ‘फिक्सर’ म्हटल्याचा आरोप केला होता.

मोठी बातमी : कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द

श्रीशांतला नोटीस बजावली
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या आयुक्तांनी श्रीशांतला कायदेशीर नोटीस बजावली आहे. टी-20 स्पर्धेत खेळताना श्रीशांतने त्याच्या कराराचे उल्लंघन केल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. श्रीशांतने खेळाडूवर टीका करणारे व्हिडिओ काढून टाकले तरच त्याच्याशी चर्चा सुरू केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.

गाय झाली ‘वधू’ अन् बैल झाला ‘वर’, जळगावातून मध्य प्रदेशात पोहोचली लग्नाची वरात

गौतम गंभीर-श्रीशांत वादाचा सामना झाल्यानंतर पंचांनीही आपला अहवाल सादर केला होता. यामध्ये ‘फिक्सर’ शब्दाचा उल्लेख नव्हता, असे म्हटले होते. आता या प्रकरणावर गंभीर आणि श्रीशांतच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे.

नेमकं काय घडलं?
लेजेंड्स लीग क्रिकेटच्या एलिमिनेटर सामन्यात दुसरे षटक टाकायला आलेल्या श्रीशांतच्या पहिल्या चेंडूवर गौतम गंभीरने षटकार खेचला आणि पुढच्या चेंडूवर चौकार मारला. मात्र यानंतर गौतम गंभीर आणि श्रीशांतमध्ये बाचाबाची झाली. बॉलिंग मार्कवर परतताना श्रीशांतने गंभीरकडे खुन्नस देत पाहिलं होतं. पॉवरप्लेनंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. श्रीसंतने या प्रकरणी एक व्हिडिओ शेअर करत मोठे खुलासे केले होते. या व्हिडिओमध्ये गंभीरवर आरोप करताना श्रीशांत म्हणाला की, गंभीर त्याला सातत्याने फिक्सर म्हणत होता.

Exit mobile version