Download App

अफगाणिस्तानला एक चूक नडली, मॅक्सवेलने संधीच सोनं केलं

Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 गडी राखून पराभव केला आहे. खरे तर एके काळी अफगाणिस्तानचा सहज विजय होईस असे वाटत होते, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. पण ग्लेन मॅक्सवेलचा झेल सोडणे अफगाणिस्तान संघाला महागात पडले. ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

128 चेंडूत 201 धावा करून ग्लेन मॅक्सवेल नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 21 चौकार आणि 10 षटकार मारले. एकवेळ ऑस्ट्रेलियाचे 7 खेळाडू 91 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी कांगारूंना विजय मिळवून दिला.

जखमी मॅक्सवेलने द्विशतक झळकावत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरी धडक

मुजीब उर रहमानने झेल सोडला
ग्लेन मॅक्सवेल 33 धावांवर खेळत असताना नूर अहमदच्या चेंडूवर मुजीब उर रहमानने झेल सोडला. यानंतर अंपायरने ग्लेन मॅक्सवेलला एलबीडब्ल्यू घोषित केले, पण नशिबाने ग्लेन मॅक्सवेलला साथ दिली. रिव्ह्यूमध्ये तो नाबाद असल्याचे दिसून आले. यानंतर नूर अहमदच्या चेंडूवर मुजीब उर रहमानचा झेल अफगाणिस्तानला चांगलाच महागात पडला.

ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने ऑस्ट्रेलियाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे 12 गुण झाले आहेत. आता उपांत्यफेरी गाठण्याचा कांगारूंचा मार्ग सुकर झाला आहे.

विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पहिले शतक, ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर

202 धावांच्या भागीदारीत पॅट कमिन्सच्या 12 धावा
अफगाणिस्तान संघाला एकटा ग्लेन मॅक्सवेल नडला. मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांच्यात 202 धावांची भागीदारी झाली होती, पण पॅट कमिन्सचे योगदान केवळ 12 धावांचे होते. अशा प्रकारे ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीचा अंदाज लावता येईल. पॅट कमिन्स 68 चेंडूत 12 धावा करून नाबाद परतला, पण ग्लेन मॅक्सवेलने उर्वरित काम पूर्ण केले. तत्पूर्वी, 91 धावांत 7 विकेट्स गमावून ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर होता, पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांकडे ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीला उत्तर नव्हते.

Tags

follow us