Hardik Pandya : 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. बीसीसीआय आतापासूनच या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या 2027 च्या विश्वचषकातून बाहेर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 2026 च्या आयपीएल दरम्यान बीसीसीआयची एक बैठक पार पडली असून या बैठकीत हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत आणि विश्वचषक 2027 बाबत (World Cup 2027) चर्चा करण्यात आली आहे.
हार्दिक 2027 चा एकदिवसीय विश्वचषक मुकणार ?
नुकतंच बीसीसीआयने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्धच्या (INDvsAFG) आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. पण मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे द टाइम्स ऑफ इंडिया च्या एका अहवालानुसार, निवडकर्त्यांची मुख्य चिंता ही आहे की, हार्दिक गोलंदाजी करताना त्याच्या 10 षटकांचा पूर्ण कोटा टाकू शकेल की नाही. बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, त्याने लवकरात लवकर फिटनेस सिद्ध करावी.
हार्दिक पुन्हा संघाशी जोडला गेला असला तरी, त्याने आपली फिटनेस सिद्ध करण्यासाठी नेमकी कोणती कार्यपद्धती (Protocol) अवलंबायची आहे, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. तो सध्या गोलंदाजी करताना त्याची पूर्ण 10 षटके टाकत नाहीये, हीच बाब निवडकर्त्यांसाठी चिंतेचा मुख्य विषय बनली आहे असं एका सूत्राने द टाइम्स ऑफ इंडिया ला सांगितले.
देशात पुढील 20 वर्ष फक्त भाजपच; ‘Axis My India’ चे प्रदीप गुप्ता यांचा मोठा दावा
तर दुसरीकडे जानेवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिक 10 षटकांचा कोटा पूर्ण करु शकत नसल्याने त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता बीसीसीआय हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
