India Beats Malaysia in Hockey Asia Cup 2025 : आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने आणखी एक नेत्रदीपक विजय नोंदवला आहे. ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने सुपर 4 फेरीत पहिला विजय मिळवला. या फेरीतील भारताचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र चमकदार खेळ करत भारताने मलेशियाचा 4-1 अशा फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच फायनलमध्ये पोहोचण्याचे आव्हान भारताने कायम ठेवलं आहे.
पहिल्याच मिनिटात मलेशियाचा गोल
या सामन्यात भारताला सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागला. पहिल्या मिनिटाला मलेशियाने वेगात गोल केला होता. त्यामुळे भारतीय संघ काहीसा दडपणाखाली आला होता. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 50 सेकंदांतच मलेशियाच्या खेळाडू्ंनी गोल केला होता. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. यानंतर लगेचच भारताने आक्रमण करण्यास सुरुवात केली. गोल करून बरोबरी साधण्याचे उद्दीष्ट होते. परंतु, यासाठी बराच वेळ संघर्ष करावा लागला. शेवटी सामन्याच्या 17 व्या मिनिटाला मनप्रित सिंहने पहिला गोल करून भारताला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली.
Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा
मलेशियाचे वापसीचे प्रयत्न अपयशी
यानंतर मात्र चित्रच पालटलं. सामन्यात भारताचाच दबदबा राहिला. पुढील सात मिनिटांच्या आत स्कोअर 3-1 असा झाला. 19 व्या मिनिटाला सुखजित सिंहने तर 24 व्या मिनिटाला शिलानंद लाकडाने गोल केले. यामुळे सामन्यात वापसी करण्याचे मलेशियाचे प्रयत्न सफल झाले नाहीत.दुसऱ्या सत्रातील 38 व्या मिनिटाला अनुभवी खेळाडू विवेक सागर प्रसादने चौथा गोल केला. यानंतर भारतीय संघाला पुन्हा गोल करता आला नाही. मात्र त्यांनी मलेशियाच्या खेळाडूंनाही गोल करू दिला नाही. अशा पद्धतीने हा सामना 4-1 अशा फरकाने भारताने जिंकला.
दरम्यान, सुपर 4 फेरीतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात भारतीय संघ 1-2 असा पिछाडीवर पडला होता. नंतर भारताने जोरदार वापसी केली. परंतु, कोरिया विरुद्धच्या या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे मलेशिया विरुद्धचा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्याचा परिणाम म्हणून भारताने मलेशियाला पराभूत केले. या विजयाबरोबरच भारताने स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे आपले आव्हान कायम ठेवले आहे.
भारताला धक्का! कॉमनवेल्थ स्पर्धांतून हॉकी, क्रिकेट, कुस्ती अन् बॅडमिंटन आऊट