Download App

… तेव्हा कपिल देवच्या डोक्यात गोळ्या घालणार होतो, पण…, योगराज सिंगांनी केला धक्कादायक खुलासा

Yograj Singh On Kapil Dev : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी माजी भारतीय

  • Written By: Last Updated:

Yograj Singh On Kapil Dev : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे आता सोशल मीडियावर (Social Media) अनेक चर्चांना उधाण आले आहे.

एका मुलाखतीमध्ये मला कपिल देव यांच्या डोक्यात गोळी घालायची होती असा धक्कादायक खुलासा योगराज सिंग यांनी केला आहे. संघातून वगळण्यात आल्याचा कारणावरुन कपिल देव यांना मारण्यासाठी मी त्यांच्या घरी पोहोचलो होते मात्र कपिल देव आईसोबत बाहेर आल्याने मी त्यांना मारलं नाही. असा खुलासा त्यांनी मुलाखतीमध्ये केला.

या मुलाखतीमध्ये बोलताना योगराज सिंग म्हणाले की, जेव्हा कपिल देव भारत, उत्तर विभाग आणि हरियाणाचा कर्णधार झाला तेव्हा त्यांनी मला कोणतेही कारण नसताना संघातून वगळले. तेव्हा माझ्या पत्नीला वाटले की मी याबाबत कपिल देवला जाब विचारावा पण कपिल देवबद्दल माझ्या मनात राग होता म्हणून मी त्याला धडा शिकवण्याचा ठरवलं आणि मी माझी पिस्तूल घेतली आणि सेक्टर 9 मधील कपिलच्या घरी गेलो. तो त्याच्या आईसोबत बाहेर आला.

मी त्याला सांगितले की तुझ्यामुळे मी एक मित्र गमावला आणि तू जे केलेस त्याची किंमत तुला मोजावी लागणार.  मला तुझ्या डोक्यात गोळी मारायची होती, पण मी असं करणार नाही कारण तुझी आई इथे आहे. असं सांगून मी आणि माझी पत्नी शबनम घरी आले आणि त्याच वेळी मी ठरवले की मी क्रिकेट खेळणार नाही, पण युवराजला क्रिकेटपटू करेन.

मित्राच्या शपथविधी समारंभाला जाणार नाही PM मोदी, एस जयशंकर करणार भारताचं प्रतिनिधित्व

तसेच या मुलाखतीमध्ये त्यांनी बिशनसिंग बेदींबद्दल (Bishan Singh Bedi) देखील खुलासा केला. मी बिशनसिंग बेदींना कधीही माफ केले नाही. तो माणूस बेडवरच मेला. जेव्हा मला संघातून वगळण्यात आले तेव्हा मी रवींद्र चढ्ढा यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगतिले की, बिशन सिंग बेदी (मुख्य निवडकर्ता) मला निवडू इच्छित नव्हते कारण त्यांना वाटत होते की, मी सुनील गावस्करचा माणूस आहे. असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला.

follow us