तुम्हीच खरे हिरो, आत्महत्या न करता नवीन तंत्रज्ञानाकडे वळा…; कपिल देव यांचे शेतकऱ्यांना आवाहन
Kapil Dev : कधी नापिकी तर कधी कोरडा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी शेतीमालाला योग्य भावच नाही, या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी आत्महत्येचा (Farmers Suicide) मार्ग स्वीकारत आहेत. शेतकरी आत्महत्येचं हे सत्र थांबता थांबेना. दरम्यान, आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं.
तुमचं सरकार दीडचं महिने…चांगला राज्यकारभार चालवा; तनपुरेंनी CM शिंदेंचं नाव घेत खडसावलं…
शेतकरी आमच्यासाठी खरे हिरो आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की, मला फार वाईट वाटतं. शेतकऱ्यांनी परिस्थितीशी झुंज देत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे कपिल देव यांनी केले आहे.
कपिल देव नांदेड येथील एका खासगी कृषी कंपनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं. ते म्हणाले, शेतकरी देशातील प्रत्येकाला अन्न पुरवतात. मात्र, जेव्हा मी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ऐकतो, अथवा बातम्यांमध्ये वाचतो तेव्हा मला फार वाईट वाटते, मनाला दु:ख होतं. वाईट काळ येतो तेव्हा आपण पण शेतकऱ्यांनी धीर धरला पाहिजे. त्यांनी मनातील विश्वास ढळू देऊ नये. आयुष्यातील प्रत्येकाने धिरानं लढलं पाहिजे, असं कपिल देव म्हणाले.
पक्षनिष्ठेचं फळ! राजन पाटलांवर राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी
पुढं ते म्हणाले, शेतीमालाचे भाव वाढण्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेतकरी कष्ट करून संपूर्ण देशाचे पोट भरतात, त्यांना त्रास होत असेल तर आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे, असंही कपिल देव म्हणाले.
नवीन तंत्रज्ञानाकडे वळा…
देशातील शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे. एखादी कंपनीने काही चुकीचं केलं असेल तर सगळ्या कंपन्यांना आपण चुकीचं ठरवू शकत नाही. भारतात शेतकरी आणि सैनिकांपेक्षा मोठा कोणी नाही. मी शेतकऱ्यांना एवढेच सांगेन, तुम्ही संपूर्ण देशाचे पोट भरता. तुम्ही नाही तर आम्ही नाही, जेवढे कष्ट शेतकरी किंवा सैनिक करतात, तेवढे कष्ट कोणीही करत नाही. खऱ्या अर्थाने आमच्यासाठी शेतकरी हिरो आहेत. सरकारचे काम सरकार करेल, आम्ही काय करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे, असं कपिल देव म्हणाले.