IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सच्या (IND vs ENG) मैदानात सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजवर (Mohammed Siraj) आयसीसीकडून (ICC) मोठी कारवाई करण्यात आली आहे. माहितीनुसार, आयसीसीने सिराजवर एकून मॅच फीसचा 15 टक्के दंड ठोठावला आहे.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी सिराजने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन डकेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विकेट घेतल्यानंतर सिराजने जोरदार आनंद साजरा केला. मात्र आनंद साजरा करताना सिराज बेन डकेट जवळ पोहचला. या दरम्यान दोन्ही खेळाडूंचे खांदेही एकमेकांना आपटले. यावरुन आता आयसीसीने सिराजवर कारवाई केली आहे आणि सिराजला सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. याआधी दुसऱ्या दिवशीही सिराज पंचांशी भांडताना दिसला होता. तथापि, त्यावेळी आयसीसीने सिराजविरुद्ध कोणतीही मोठी कारवाई केली नव्हती.
🚨 FINE FOR MOHAMMED SIRAJ 🚨
– Siraj has been fined 15% of match fees for his celebration after the wicket of Duckett. pic.twitter.com/Dxte2C9nyO
— Johns. (@CricCrazyJohns) July 14, 2025
सिराजने दाखवली चमक
पहिल्या कसोटी सामन्यात फक्त दोन विकेट घेणारा सिराजने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली आहे. सिराजने दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट घेत भारताच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती तर तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी 2-2 विकेट घेतले आहे. या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 127 धावांची आवश्यकता आहे. सध्या के. एल. राहुल 36 वर आणि पंत 9 धावांवर खेळत आहे.
कुरैश समाजाचा मोठा निर्णय…, अहिल्यानगरमध्ये जनावरे खरेदी विक्रीचा व्यापार केला बेमुदत बंद