इंग्लंडविरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, सिराजला डच्चू, तर गिलकडे उपकर्णधार पद
India Squad For England ODI: बीसीसीआयने (BCCI) आज इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय 3 सामन्यांच्या मालिकेसाठी आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी मोठा निर्णय घेत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) डच्चू दिला आहे तर हर्षित राणाला संघात कायम ठेवण्यात आले आहे. याच बरोबर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलकडे (Shubman Gill) उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची तयारी तपासण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना नागपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना कटक येथे 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबाद येथे 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा
तर दुसरीकडे आज बीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी देखील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. हर्षित राणाच्या जागी जसप्रीत बुमराह असणार आहे. 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने सुरक्षेमुळे पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नसल्याने भारताचे सामने युएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये दुबई येथे सामना होणार आहे. तर 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध भारत खेळणार आहे.
स्पर्धेच्या अ गटात भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह पाकिस्तानचा समावेश आहे तर ब गटात ऑस्ट्रेलियासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हर्षित राणा.
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – 6 फेब्रुवारी, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
दुसरा एकदिवसीय सामना – 9 फेब्रुवारी, बाराबती स्टेडियम, कटक
Champions Trophy 2025 भारतीय संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी
तिसरा एकदिवसीय सामना – 12 फेब्रुवारी, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद