WC 2023 : भारत-पाक सामन्यासाठी प्रेक्षकांचा जुगाड; हॉटेलऐवजी थेट हॉस्पिटलमध्ये बुकींग

India Vs Pak Ahmadabad Match :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स […]

Letsupp Image   2023 07 21T162019.250

Letsupp Image 2023 07 21T162019.250

India Vs Pak Ahmadabad Match :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स जवळपास बुक झाली आहेत आणि त्यांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत.

त्यामुळे आता चाहत्यांनी एक देशी जुगाड लावला आहे. हा सामना पाहण्यासाठी त्यांनी हॉटेलऐवजी चक्क हॉस्पिटलचे बुकिंग सुरू केले आहे. विश्वचषक स्पर्धेचे सामने 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. 46 दिवस चालणाऱ्या आयसीसी स्पर्धेत 10 संघ सहभागी होत असून एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.

Sachin vs Virat Kohli : 100 ते 500 सामने… सचिन की विराट कोण कोणावर भारी?

अहमदाबाद मिररच्या बातमीनुसार, अहमदाबादमध्ये या सामन्यामुळे हॉटेलचे एका दिवसाचे भाडे जवळपास 50 हजारांवर पोहोचले आहे. त्याच वेळी, रुग्णालयात एक-दोन मुक्कामासाठी त्यांना 3 हजार ते 25 हजार इतकाच खर्च करावा लागणार आहे, जे हॉटेलच्या भाड्यापेक्षा सुमारे 25 हजार रुपयांनी कमी आहे.

एका खाजगी रुग्णालयाचे संचालक डॉ. पासर शाह यांनी सांगितले की, येणारे लोक हे रुग्णालयात संपूर्ण शरीर तपासणी आणि रात्रीचा मुक्काम करण्यास सांगत आहेत, जेणेकरून त्यांची दोन्ही कामे पूर्ण होतील. राहण्यासोबतच त्यांच्या शरीराची तपासणीही होईल आणि पैशांचीही बचत होईल.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

दुसरीकडे, दुसरे डॉक्टर निखिल लाल यांनी सांगितले की, १५ ऑक्टोबरच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये २४ ते ४८ तास राहण्यासाठी बरीच चौकशी केली जात आहे, कारण आमच्याकडे बॉडी चेकअपचे पॅकेज आहे. याचे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामना. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. विश्वचषकापूर्वी आशिया चषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामना होण्याची शक्यता आहे. हे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे.

Exit mobile version