Sachin vs Virat Kohli : 100 ते 500 सामने… सचिन की विराट कोण कोणावर भारी?

  • Written By: Published:
Sachin vs Virat Kohli  : 100 ते 500 सामने… सचिन की विराट कोण कोणावर भारी?

Sachin and Virat Records : करोडो क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीकडे लागल्या आहेत. कारण विराट कोहली या ऐतिहासिक मैदानावर कारकिर्दीतील 500 वा खेळत आहे. विराट कोहलीचा हा 500 वा सामना आता खूप खास बनला आहे कारण हा अनुभवी खेळाडू शतकाच्या जवळ आहे. विराट कोहली 87 धावांवर नाबाद असून त्याला 76 व्या शतकासाठी फक्त 13 धावांची गरज आहे. तसे, विराटने शतक झळकावले किंवा नाही, त्याने याआधीच विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.(Virat Kohli Vs Sachin Tendulkar After 500 Matches Records Runs Average Centuries)

विराट कोहलीची तुलना अनेकदा सचिन तेंडुलकरशी केली जाते आणि असे म्हटले जाते की केवळ किंग कोहलीच क्रिकेटच्या देवाचा शतकांचा विक्रम मोडू शकतो. हे देखील शक्य आहे कारण विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला 500 सामन्यांमध्ये मागे टाकले आहे. सचिन आणि विराट कोहली यांच्यातील100, 200, 300, 400, 500 सामन्यांची स्पर्धा. कोणी किती धावा काढल्या आणि किती शतके त्याच्या बॅटमधून निघाली.

विराट विरुद्ध सचिन – 100 सामने

विराट कोहलीने केवळ 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सचिनला मागे टाकले होते. विराट कोहलीने 100 सामन्यांमध्ये 44.37 च्या सरासरीने 4038 धावा केल्या होत्या, 11 शतके, 23 अर्धशतके त्याच्या बॅटमधून निघाली होती, तर सचिन धावा, शतके आणि अर्धशतकांच्या बाबतीत त्याच्या खूप मागे राहिला. सचिनने 100 सामन्यांमध्ये 39.22 च्या सरासरीने 3766 धावा केल्या. या कालावधीत त्याने 7 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली.

विराट विरुद्ध सचिन – 200 सामने

विराट कोहलीने 6 नोव्हेंबर 2014 रोजी 200 वा सामना खेळला आणि यादरम्यान त्याने 8777 धावा केल्या. विराट कोहलीची सरासरी 47.70 आहे आणि त्याच्या बॅटने 26 शतके आणि 49 अर्धशतके केलीत. सचिनबद्दल बोलायचे झाले तर त्याने 200 सामन्यात त्याने 22 शतके आणि 50 अर्धशतकाच्या मदतीने 8815 धावा केल्या होत्या. म्हणजे 200 सामन्यांनंतर विराट सचिनच्या मागे होता.

विराट विरुद्ध सचिन – 300 सामने

विराट कोहलीने 45 शतकांच्या जोरावर 300 सामन्यांनंतर 14749 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरीही 52 होती. या काळात सचिनने 14183 धावा केल्या. सचिनच्या धावा कमी होत्या पण त्याने विराटपेक्षा 2 शतके जास्त केली होती.

विराट विरुद्ध सचिन – 400 सामने

विराट कोहलीने 300 ते 400 सामन्यांमध्ये वेग पकडला. या खेळाडूने 70 शतकांच्या जोरावर 21359 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 100 अर्धशतके झळकली. विराटची सरासरीही 57 होती. त्याचवेळी 400 सामन्यांनंतर सचिनच्या केवळ 19949 धावा केल्या होत्या. त्याची शतकेही 63 होती. त्याने एकूण 90 अर्धशतके झळकली.

विराट विरुद्ध सचिन – 500 सामने

सचिनने 500 सामन्यांनंतर 48.48 च्या सरासरीने 24874 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 75 शतके आणि 114 अर्धशतके झळकली. दुसरीकडे, विराट आपला 500 वा सामना खेळत असून त्याने आपल्या बॅटने 25548 धावा केल्या आहेत. शतकेही 75 आहेत. शतकाचा आकडा आणखी वाढू शकतो.

विराट कोहली सचिनपेक्षा खूप पुढे आहे, आकडेवारीच्या बाबतीत तो हीच आघाडी कायम ठेवेल आणि एक दिवस सचिनचा शंभर शतकांचा विक्रमही विराट मोडेल अशी अपेक्षा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube