Kapil Dev On Hardik Pandya : भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दुखापतींपूर्वीमुळे खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होते, याकडे कपिल देव यांनी लक्ष वेधले. 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, दुखापतीमुळे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू संघाबाहेर गेले नाही तर भारतीय संघ अधिक मजबूत होईल.
एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले, दुखापती हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. मला आशा आहे की परिस्थिती सुधारेल. मला नेहमीच हार्दिक पांड्याबद्दल काळजी वाटते. तो खूप लवकर जखमी होतो. त्याच्यासह सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही.
देशात रुग्णालयांपेक्षा मंदिरं जास्त…; IIT पवईच्या अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
सध्या भारतीय खेळाडू ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नाहीत. भारतीय संघाला 2023 विश्वचषकापूर्वी आपल्या प्रमुख खेळाडूंनी पूर्ण तंदुरुस्तीसह परतावे, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केल्यानंतर तो ब्रेकवर आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला पण चेन्नई सुपर किंग्जकडून 5 विकेटने पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्या आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर क्रिकेट अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर, हार्दिक पांड्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.