देशात रुग्णालयांपेक्षा मंदिरं जास्त…; IIT पवईच्या अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
IIT Powai : आयआयटी पवईच्या एका टीमने देशातील मंदिरं (Temple)आणि रुग्णालयांबद्दल (Hospital)केलेल्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात सध्या साडेसात लाख मंदिरं आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत एका मंदिरामागे भाविकांची संख्या ही 1886 इतकी आहे. दुसरीकडे देशातील नागरिकांच्या आरोग्याची (Health)काळजी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्या मात्र 69 हजार 264 इतकी आहे. एका रुग्णालयामागे 1 लाख 87 हजार 697 रुग्ण आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)77 हजार 283 मंदिरं आहेत आणि त्यातील एका मंदिरामागे 1612 एवढी भाविकांची संख्या आहे. ही आकडेवारी मार्च 2022 पर्यंतची असल्याची माहिती समोर आली आहे. (IIT Powai research India has more temples than hospitals)
देशभरातील मंदिरांबद्दलची माहिती एका ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे मंदिरांची छायाचित्रे, व्हिडीओ, माहात्म्य आदी गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्या, यासाठी देशभरात नेमके किती मंदिरं आहेत याची माहिती मिळावी यासाठी आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांच्या एका टीमने धर्मविकी नावाचा प्रकल्प हाती घेतला होता. संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागाचे मुख्य प्राध्यापक गणेश रामाकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष माहेश्वरी, अरुण जयरामाकृष्णन, प्रा. साकेत नाथ, प्रा. रवी पूर्वी या प्रकल्पावर काम करत आहेत. देशभरातून दोन हजार स्वयंसेवक प्रकल्पाशी जोडले गेले.
श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
या टीमने केलेल्या अभ्यासानुसार, देशातील साडेसात लाख मंदिरांच्या आकडेवारीनुसार सरासरी 1886 भाविकांमागे एक तर महाराष्ट्रात 1612 भाविकांमागे एक मंदिर असल्याचे या अभ्यासामध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर गोव्यामध्ये 847 लोकांमागे 1 मंदिर, तामिळनाडूमध्ये 970, कर्नाटक 1098, आंध्र प्रदेश 1123, तेलंगणा 1333, गुजरात 1408, ओडिशा 1428, केरळ 1562, हिमाचल 1639, उत्तर प्रदेश 6250, मध्यप्रदेश 3030 लोकांमागे तसेच राजस्थानमध्ये एका मंदिरामागे 2024 भाविक असल्याची माहिती या अभ्यासामधून समोर आली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत मंदिरांची संख्या
पुणे 10050, ठाणे 5511, नाशिक 4666, सातारा 4332, अहमदनगर 4198, कोल्हापूर 3398, छत्रपती संभाजीनगर 3364, मुंबई उपनगर 3295, नागपूर 3221, रायगड 3069, जळगाव 2976, सोलापूर 2909, सांगली 2759, रत्नागिरी 2063, अमरावती 1897, सिंधुदुर्ग 1709, बुलडाणा 1551, लातूर 1542, बीड 1531, नांदेड 1366, परभणी 1095, यवतमाळ 1047, धाराशिव 1035, जालना 988, वर्धा 865, मुंबई 850, चंद्रपूर 813, रायगड 786, पालघर 774 वाशिम 681,हिंगोली 542, नंदूरबार 530, गोंदिया 361, गडचिरोली 209 एवढी मंदिरं आहेत.