पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत सातत्याने नवीन मागण्या मांडत आहे. आता एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानसोबत होणाऱ्या सराव सामन्यांमध्ये खेळण्यास पीसीबीने नकार दिला आहे. पीसीबीला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बिगर आशियाई संघासोबत सराव सामना खेळायचा आहे. (icc-odi-world-cup-2023-pakistan-refuse-to-play-afghanistan-in-warm-up-match-wants-to-play-a-non-asian-team)
आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. याबाबत जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत त्यांना एकदिवसीय विश्वचषकात आशिया बाहेरील संघासोबत सराव सामना खेळायचा आहे. याबाबत पाकिस्तानी बोर्डाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला पत्रही लिहिले आहे.
पीसीबीला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानसोबतच्या सामन्यांचे ठिकाण बदलायचे आहे
यापूर्वी आयसीसीने पाठवलेल्या ड्राफ्ट वेळापत्रकात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने या दोन्ही सामन्यांच्या स्थळ बदलण्याबाबत सांगितले आहे. ड्राफ्ट वेळापत्रकानुसार, पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये आणि अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईमध्ये खेळायचे आहे.
शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!
एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो. यामध्ये 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. त्याचबरोबर विश्वचषकाचा पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो. यासंदर्भात, आयसीसीकडून 27 जून रोजी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. या दिवसापासून विश्वचषक सुरू होण्यास बरोबर 100 दिवस उरले आहेत.