Download App

अखेर ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर खेळण्यास पाकिस्तानचा होकार; उद्या जाहीर होणार वर्ल्डकपचे वेळापत्रक

ICC One Day World Cup Schedule 2023: या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अहमदाबादच्या मैदानावर भारतासोबत सामना खेळण्यास संमती दिली आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघ बंगळुरू आणि चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध आपले सामने खेळणार आहे. बीसीसीआय 27 जून रोजी मुंबईत 11:30 वाजता एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.

2 सामन्यांचे ठिकाण बदलण्याची पाकिस्तानची मागणी आयसीसी आणि बीसीसीआयने फेटाळून लावली आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाऊ शकतो. 27 जूनपासून या मेगा टूर्नामेंटसाठी 100 दिवसांचे काउंटडाऊन सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला दिलेल्या निवेदनात सांगितले की, 27 जून रोजी वेळापत्रक जाहीर केले जाईल. यासंदर्भात आयसीसी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. मसुद्याच्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानने याला संमती दिली आहे.

600 गाड्यांच्या ताफ्यासह बीआरएसचं वादळ सोलापूरच्या दिशेने; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार?

पाकिस्तानने यापूर्वी अहमदाबादच्या मैदानावर भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्याने हा सामना चेन्नई, बेंगळुरू किंवा कोलकाता येथे हलवण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने सामन्याचे ठिकाण बदलण्यामागे राजकीय कारणे सांगितली होती.

या सामन्याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या मैदानावर होणार आहे. पाकिस्तानने सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती, मात्र आम्ही त्यात कोणताही बदल केलेला नाही. या स्पर्धेतील हा एक महत्त्वाचा सामना असून आयसीसी याला पूर्णपणे महत्त्वाचा सामना मानत आहे.

MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…

या स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. ही मेगा टूर्नामेंट 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते तर जेतेपदाचा सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाऊ शकतो.

 

Tags

follow us