Download App

ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत अश्विन-जडेजाचा दबदबा, यशस्वी जैस्वालची मोठी झेप

ICC Test Rankings: आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठी झेप घेतली आहे. पहिल्याच कसोटीत दीड शतकी खेळी केलेल्या यशस्वी जैस्वाल फलंदाजांच्या क्रमवारीत 73 व्या क्रमांकावर पोहचला आहे. यशस्वीचे 420 रेटिंग गुण आहेत. गोलंदाजी क्रमवारीत रविचंद्रन अश्विन तर अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहेत.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्माला चांगला फायदा झाला आहे. फलंदाजी क्रमवारीत रोहित दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित सध्याच्या यादीत सर्वोच्च रँकिंग असलेला भारतीय फलंदाज बनला आहे. पहिल्या दहामध्ये तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.

यामध्ये न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर तर मार्नस लबुशेन पाचव्या क्रमांकावर आहे. युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल 73 व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शानदार कामगिरी करताना त्याने शतक झळकावले होते.

Gujarat Riots : तीस्ता सेटलवाड यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

अश्विन कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचे 884 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आहे.

बजरंग पुनिया, विनेश फोगट आशियाई स्पर्धेत खेळणार, मात्र इतर कुस्तीपटू नाराज

अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. जडेजामध्ये 449 रेटिंग गुण आहेत. अश्विन अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्याकडे 362 रेटिंग गुण आहेत. बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसन तिसऱ्या स्थानावर आहे. बेन स्टोक्स चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे. अक्षराचे 303 रेटिंग गुण आहेत.

Tags

follow us