World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेत आज इंग्लड आणि भारतीय संघात लढत होतं आहे. लखनौमधील एकना स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. भारताने आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली असून हा सामना जिंकण्यासाठीही भारतीय संघाकडून चढाओढ सुरुच असल्याचं पाहायला मिळतयं. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने हाताला काळी पट्टी बांधली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने हातात काळी पट्टी का बांधलीयं? हाच प्रश्न सध्या अनेक क्रिकेटप्रेमींना पडला आहे. त्यामुळे याचं नेमकं कारण आपण जाणून घेऊयात.
पैसे दिल्यानंतर लोक परत करत नाही… : सामुहिक आत्महत्या केलेल्या कुटुंबाची चार ओळींची सुसाईड नोट
नूकतचं भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं. बिशन सिंग बेदी गेल्या शतकातील टीम इंडियाचे महान स्पिनर होते. भारतीय संघाने आजच्या इंग्लडविरुद्धच्या सामन्यात बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हातावर काळी पट्टी बांधली आहे. या सामन्याआधीच बीसीसीआयने यांसदर्भात माहिती दिली होती.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं
“आयसीसी पुरुषांच्या वनडे विश्वचषक २०२३ च्या इंग्लंडविरुद्धचा सामन्यामध्ये महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांच्या स्मरणार्थ भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरणार असल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाने हाताला काळी पट्टी बांधली आहे.
Sharad Pawar : पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही
बिशनसिंग यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पुढे 13 वर्षे ते टीम इंडियासाठी मॅचविनर ठरले. 1979 मध्ये निवृत्तीपूर्वी बिशनसिंग बेदी यांनी 67 कसोटी सामने खेळले. 28.71 च्या उत्कृष्ट सरासरीने 266 बळी घेतले. या काळात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे ते गोलंदाज होते.
अजितदादांना बारामतीतच बंदी! मराठा समाजाच्या प्रचंड विरोधामुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की
1970 च्या दशकात फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध चौकडीचा बिशनसिंग बेदी (बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, राघवन) एक भाग होते. गोलंदाजीशिवाय बिशनसिंग बेदी यांच्याकडे नेतृत्व क्षमताही होती. बिशनसिंग बेदी यांची 1976 मध्ये टीम इंडियाचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी 1978 पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून बिशनसिंग बेदी यांनी 1976 मध्ये वेस्ट इंडिजचा त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभव केला होता.
दरम्यान, क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही बिशनसिंग बेदी यांचा खेळाशी संबंध राहिला. समालोचक म्हणूनही बेदींनी क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला. प्रशिक्षक म्हणूनही बिशनसिंग बेदी दीर्घकाळ क्रिकेटशी जोडले गेले. एवढेच नाही तर फिरकीला भारताला मजबूत करण्यासाठी बिशनसिंग बेदी यांनी नवीन खेळाडूंना प्रशिक्षण दिले आणि भारतीय क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले.