Download App

140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले, ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा ‘षटकार’

IND vs AUS Final : भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावा करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

भारताकडून बुमराहने 2 विकेट घेतल्या. तर शमी आणि सिराजने 1 विकेट घेतली. इतर गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नाही. अंतिम सामन्यात एकही भारतीय गोलंदाज प्रभावी दिसला नाही. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण नंतर दोघेही निष्प्रभ दिसले.

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय वायुसेनेची सलामी; पाहा फोटो

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर सर्वबाद झाला. 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत सामना जिंकला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली.

IND vs AUS Final : मला बोलावलंच नाही! BCCI च्या कारभारावर कपिल देव नाराज

सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या मार्नस लॅबुशेनच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. या दोघांसमोर भारताचे सर्व गोलंदाज अपयशी ठरले. हेडने शतक तर लॅबुशेनने अर्धशतक झळकावले. दोन्ही फलंदाजांनी हुशारीने डाव पुढे नेत कांगारू संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, ट्रॅव्हिस सामना जिंकण्यापूर्वी 2 धावांवर बाद झाला.

Tags

follow us