Download App

IND vs AUS Final : भाजपचं ट्विट, काँग्रेसनं म्हटलं जितेगा ‘इंडिया’! वर्ल्डकपच्या निमित्ताने राजकीय फटकेबाजी

IND vs AUS Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने (IND vs AUS Final) ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे आव्हान दिले. या सामन्यासाठी देशातील कोट्यावधी चाहत्यांच्या शुभेच्छा टीम इंडियाच्या पाठिशी होत्या. राजकारणी मंडळींनी एकदिलाने पाठिंबा दिले. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक भाजप आणि काँग्रेसचे सूरही यानिमित्ताने जुळल्याचे दिसून आले. विश्वास ठेवणं तसं कठीणच पण, भाजपनं केलेलं एक ट्विट काँग्रेसने रिट्विट केलं. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अंतिम सामन्यात भारताचा संघ विजयी व्हावा या उद्देशाने भाजपाने एक ट्विट केले. “Come on Team India, We Believe in you!” असे हे ट्विट होते. त्यावर चक्क काँग्रेसने प्रतिक्रिया देत हे ट्विट रिट्विट केले. “True That Jeetega India” असे काँग्रेसने म्हटले. त्यांच्या या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी म्हटले आहे की देशासाठी दोन्ही विरोधक अखेर एकत्र आले. तर काही जणांनी मतभेद असले पाहिजेत पण मनभेद नको असे म्हटले आहे. काँग्रेसने भाजप विरोधात देशभरात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. अशा वेळी क्रिकेटच्या निमित्ताने का होईना भाजपनं इंडिया म्हटल्यानं त्यांचं हे ट्विट चांगलच चर्चेत आलं आहे.

ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे टार्गेट 

विश्वचषक स्पर्धेचा (IND vs AUS Final) अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (IND vs AUS) 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अचूक प्लान करून मैदानात उतरले होते. त्यांनी प्रत्येक फलंदाजासाठी वेगळे प्लान केला आला होता.

IND vs AUS Final : ..अन् अचानक सामना थांबला! प्रसंग असा की सगळेच गोंधळले

अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी किती निराशाजनक होती, याचा अंदाज 11 ते 40 षटकांमध्ये केवळ दोनच चौकार मारण्यात आल्याने लावता येतो. विश्वचषकाच्या सामन्यात अशा प्रकारची फलंदाजीची चाहत्यांनी अपेक्षा केली नसेल.

Tags

follow us