Download App

Travis Head : आधी ‘कसोटी’ आता ‘वर्ल्डकप’! ‘हेड’ दोनदा ठरला टीम इंडियाची ‘डोकेदुखी’

Travis Head : विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला अंतिम (IND vs AUS Final) सामन्यात मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. सगळ्याच आघाड्यांवर ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ वरचढ ठरला आणि वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा भंगलं. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड (Travis Head) ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आताच नाही तर याआधीही हेडने कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न धुळीस मिळवले होते. यावर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही ट्रॅव्हिस हेडने पहिल्या डावात 163 रन करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.

IND vs AUS Final : मला बोलावलंच नाही! BCCI च्या कारभारावर कपिल देव नाराज

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या. त्यानंतर या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हेडने शानदार शतक ठोकत भारताच्या अडचणी वाढवल्या. हेडच्या खेळीनेच भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब राहिली. पहिल्या सहा ओव्हर्समध्येच तीन विकेट पडल्या होत्या. त्यानंतर मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शानदार खेळ करत संघाचा डाव सावरला आणि विजयही मिळवून दिला.

वर्ल्ड टेस्टमध्येही हेड प्लेअर ऑफ द मॅच

जागतिक कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 469 रन केले होते. ज्यामध्ये 174 बॉल्समध्ये 163 धावा त्याने केल्या होत्या. या खेळीत हेडने 25 चौकार आणि एक षटकार मारला होता. हेडच्या या खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला होता. या विजयानंतर ट्रॅव्हिस हेडला सामनावीरचा पुरस्कारही मिळाला होता.

IND vs AUS Final : भाजपचं ट्विट, काँग्रेसनं म्हटलं जितेगा इंडिया! वर्ल्डकपच्या निमित्ताने राजकीय फटकेबाजी

भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताकडून बुमराहने 2 विकेट घेतल्या. तर शमी आणि सिराजने 1 विकेट घेतली. इतर गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नाही. अंतिम सामन्यात एकही भारतीय गोलंदाज प्रभावी दिसला नाही. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण नंतर दोघेही निष्प्रभ दिसले.

Tags

follow us