IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी कांगारुंना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची दुखापत गंभीर असून तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर दुसरा वनडे 24 सप्टेंबरला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. त्याचबरोबर भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
भाजप खासदाराला दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते
पॅट कमिन्स एकदिवसीय मालिकेतून बाहेर
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स मनगटाच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे पॅट कमिन्सचे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणे संशयास्पद मानले जात आहे. दरम्यान, पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नाही, तर कांगारू संघाला मोठा धक्का बसणार आहे.
त्याचबरोबर भारताविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विश्वचषक खेळवला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 8 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नई येथे होणार आहे.
Pat Cummins could miss the 3 match ODI series against India next month due to a wrist injury. pic.twitter.com/n1ApOg2rPg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 5, 2023
ऑस्ट्रेलियाने अॅशेस कप राखला
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेत मैदानात दिसला होता. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले, मात्र त्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकला. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. पण पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अशाप्रकारे अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली, मात्र ऑस्ट्रेलियन संघाला अॅशेस राखण्यात यश आले.