भाजप खासदाराला दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते

भाजप खासदाराला दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते

MP Ram Shankar Katheria : उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना आग्रा येथील न्यायालयाने प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. खासदार रामशंकर कठेरिया यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता.

कोर्टाच्या निकालानंतर कठेरिया म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय मान्य आहे मात्र वरच्या कोर्टात अपील करणार आहे. ही घटना 16 नोव्हेंबर 2011 ची आहे. हरिपर्वत पोलिस ठाण्यात खासदार रामशंकर कठेरिया आणि अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खासदार रामशंकर कठेरिया यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यातील साक्ष आणि वादविवादाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमपी एमएलए न्यायालयाने तब्बल 11 वर्षांनंतर शनिवारी निकाल दिला.

या निकालात इटावाचे खासदार रामशंकर कठेरिया यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदार रामशंकर कठेरिया यांनी 12 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एक महिला रडत त्यांच्याकडे आली.

मी राहुल गांधींशी लग्नासाठी तयार, चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीची खुली ऑफर

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ती महिला त्रस्त होती. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. महिलेच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी आलो होतो. त्यावेळी चर्चेदरम्यान गदारोळ झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर टोरेंट पॉवरचे सुरक्षा निरीक्षक समेधी लाल यांनी हरिपर्वत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन खासदार कठेरियाविरोधात गुन्हा दाखल केला होता.

खबरदार! तरुणींची छेड काढाल तर… दंडुका घेऊन दामिनी पथक सज्ज, टवाळखोरांची मस्ती जिरणार

अधिकाऱ्याने सांगितले की टोरेंट पॉवर लिमिटेड (आग्रा) च्या कार्यालयात वीज चोरीशी संबंधित प्रकरणावर काम सुरु होते. त्याचवेळी खासदार रामशंकर कठेरिया यांच्यासोबत असलेले 10-15 समर्थक कार्यालयात घुसले आणि हाणामारी केली. यामध्ये कंपनीचे व्यवस्थापक भावेश रसिक लाल शहा गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, कठेरिया हे आग्रा येथून खासदारही राहिले आहेत. ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षही होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube