मी राहुल गांधींशी लग्नासाठी तयार, चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीची खुली ऑफर

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 08 05T183426.751

Sherlyn Chopra : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हरियाणातील महिला शेतकऱ्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भोजनासाठी बोलावले होते. यावेळी त्या महिलांना सोनिया गांधी ‘राहुल गांधींचे लग्न करा, असा सल्ला दिला होता. यावर सोनिया गांधींनी ‘तुम्हीच मुलगी शोधा.’असे म्हटले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुढाकार घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत लग्नाला होकार दिला आहे.

सध्या शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे. याचे कारण म्हणजे या व्हिडिओमधून शर्लिन चोप्राने राहुल गांधी यांच्यासोबत लग्नाला होकार दिला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्राला विचारण्यात आले होते की, तिला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का? याला उत्तर देताना ती म्हणते की ‘हो का नाही’. यापुढे शर्लिननेही लग्नासाठी एक अट घातली आहे. लग्नानंतरही सरनेम चोप्रा राहावे असे ती म्हणते.

‘माझी बायको… माझं वेड’, मराठमोळ्या रितेशची जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

शर्लिन चोप्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे. यावर अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, मला वाटते राखी सावंतसारखा नशा हिनेही केला आहे. दुसऱ्या एकाने लिहिले की, राहुल गांधींनी हिच्याशी लग्न करून आयुष्य वाया घालवू नये. आणखी एका यूजरने लिहिले की, तुमच्यासोबत ते कधीच लग्न करणार नाही. तर आणखी एका युजरने लिहिलं की तुम्ही नक्की लग्न कराल पण ते करणार नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

दरम्यान, शर्लिन चोप्रा सातत्याने वादात सापडते. शर्लिन चोप्रा बिग बॉस घरातून चर्चेत आली होती. यामध्ये तिचे साजिद खानसोबत मोठा वाद झाला होता. साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले होते पण यामध्ये तिला यश आले नव्हते. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यापर्यंत धाव घेतली होती. साजिद खानविरोधात तक्रारही दाखल केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube