IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघात कमिन्स आज खेळत नाही. कमिन्सच्या जागी हेझलवूडचा समावेश आहे. भारताकडून बुमराहच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे.
ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करुन बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जोरदार धुलाई केली. श्रेयस अय्यरने अवघ्या 86 चेंडूत शतक झळकावले. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. 90 चेंडूत 105 धावा अय्यर बाद झाला. 216 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. त्यानंतर शुभमन गिलनेही शानदार शतक झळकाले. त्याने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 4 षटकार मारले. भारताच्या 35 ओव्हरमध्ये 3 विकेट गमवून 253 धावा आहेत. आता कर्णधार केएल राहुल आणि इशान किशन क्रीजवर आहेत.
पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १५० जागांसाठी भरती
भारताची प्लेइंग 11 –
शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11- डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिश, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.