Download App

IND vs AUS: रोहित शर्मा घेणार निवृत्ती? मुख्य निवडकर्ता अजित आगरकर मेलबर्नमध्ये दाखल

IND vs AUS: बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्न (Melbourne) येथे खेळवला

  • Written By: Last Updated:

IND vs AUS : बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्न (Melbourne) येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो.

चौथ्या कसोटी सामनाच्या पहिल्या डावात रोहित शर्माला फक्त 3 धावा करत्या आल्या तर आतापर्यंत या मालिकेत रोहितने 22 धावा केल्या आहे. त्यामुळे या मालिकेत किंवा मालिकेनंतर रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करू शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीनंतर (Border – Gavaskar Trophy) निवृत्ती जाहीर करणार आहे. मुख्य निवडर्कता अजित आगरकर (Ajit Agarkar) देखील मेलबर्नमध्ये दाखल झाला असून तो रोहित शर्मासोबत भविष्याबाबत चर्चा करणार असल्याचा देखील दावा करण्यात येत आहे.

रोहित शर्मा दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर आला होता तर आता चौथ्या कसोटी सामन्यात तो सलामीवीर म्हणून खेळत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला नाही तर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. सध्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत पहिला कसोटी भारतीय संघाने जिंकला होता तर दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता आणि तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे भारतीय संघासाठी मेलबर्न आणि सिडनी कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्वाची आहे.

चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळसंपे पर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहेत. भारतीय संघ आता देखील ऑस्ट्रेलियाशी 310 धावांनी मागे आहे. तर भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 111 धावांची गरज आहे.

मुंबईत भीषण अपघात, भरधाव टेम्पोने 6 जणांना चिरडलं, महिलेचा मृत्यू

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातील ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला चारशे पार नेले. स्टीव्ह स्मिथने या मालिकेत दुसरा आणि त्याच्या कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या.

follow us