WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय नोंदवला. भारताचा 209 धावांनी पराभव करत WTC वरती आपले नाव कोरले. ICC ची ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. रविवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 234 धावांवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा आणि दुसऱ्या डावात 270 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 296 धावा आणि दुसऱ्या डावात 234 धावा केल्या. या सामन्यासाठी ट्रॅव्हिस हेडला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. (ind-vs-aus-wtc-final-score-live-update-5th-day-australia-vs-india-ball-by-ball-commentary-world-test-championship-final)
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गेल्या वेळी साउदम्प्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आणि विजेतेपदाचे स्वप्न भंगले. पण डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याच्या चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पुन्हा स्वप्न अधुरेच राहिले.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळवला गेला. इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये येथे कसोटी सामना झाला. या सामन्यात नाणेफेक भारताच्या बाजूने राहिली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेकीच्या वेळी रोहित म्हणाला होता की खेळपट्टीवर भरपूर गवत आहे, अशावेळी वेगवान गोलंदाजांची मदत मिळेल. पण जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा प्रकरण काही वेगळेच दिसले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 3 विकेट 76 धावांत गमावल्या. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी क्रीझवर टिचून मारा करत चौथ्या विकेटसाठी 285 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 469 धावांपर्यंत नेली. या डावात हेडने 163 आणि स्मिथने 121 धावा केल्या.
पहिल्या डावात भारतीय फलंदाज अपयशी ठरले
भारतीय संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती, पण इथेही चाहत्यांची निराशा झाली. कर्णधार रोहित शर्मा (15), विराट कोहली (14), शुभमन गिल (13), चेतेश्वर पुजारा (14) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. अजिंक्य रहाणेने 89, रवींद्र जडेजाने 48 आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा करत संघाची धावसंख्या 296 पर्यंत नेली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 धावांची मोठी आघाडी मिळाली.
इथूनच सामना भारताच्या खिशातून गेला. आता टीम इंडियाला चमत्काराची गरज आहे, पण तेही घडले नाही. 11 आणि 12 जून रोजी लंडनमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खाते लाखोंला सांगत राहिले, पण हा अंदाजही केवळ अंदाजच राहिला.
WTC Final 2023: ऑस्ट्रेलियन संघाने केले बॉल टेम्परिंग? जाणून घ्या या दाव्यामागील संपूर्ण सत्य…
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने 8 बाद 270 धावा करून डाव घोषित केला. त्यांना पहिल्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. अशा परिस्थितीत सामना जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 444 धावांचे मोठे लक्ष्य होते. भारताच्या गोलंदाजीत रवींद्र जडेजाने 3 तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवने 2-2 बळी घेतले. मोहम्मद सिराजच्या खात्यात या डावात केवळ 1 विकेट घेतली.
चहाच्या वेळेपासून भारतीय संघाला फलंदाजीची संधी मिळाली आणि कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिलने सकारात्मक सुरुवात केली. दोघांनी मिळून वेगवान 41 धावा जोडल्या. पण चहापानापूर्वी भारतीय संघाने 18 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या गिलची विकेट गमावली.
रोहित आणि पुजाराच्या रूपाने दोन धक्के, कोहली आणि रहाणेच्या आशा टिकवला
चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राला सुरुवात होताच कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनीही सकारात्मक फलंदाजी सुरू ठेवली. त्यामुळे भारतीय संघाचा धावा करण्याचा वेग 4 धावांच्या आसपास दिसत होता. रोहितने पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही लवकरच पूर्ण केली. पण यादरम्यान नॅथन लायनने रोहितच्या रूपाने टीम इंडियाला दुसरा धक्का दिला.
WTC Final 2023: ऑस्ट्रेलियन संघाने केले बॉल टेम्परिंग? जाणून घ्या या दाव्यामागील संपूर्ण सत्य…
लियॉनच्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू थेट पॅडवर आदळला आणि त्याला एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. रोहितच्या बॅटमधून 43 धावांची खेळी पाहायला मिळाली. टीम इंडियाने 92 च्या स्कोअरवर तिसरा विकेट गमावला. यानंतर लगेचच ९३ धावांवर पुजाराच्या रूपाने संघाने तिसरी विकेट गमावली. पुजाराने पॅट कमिन्सच्या चेंडूवर असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पुजारा 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
इथून सगळ्यांना वाटले की ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर पूर्णपणे कब्जा केला आहे. पण अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या जोडीने या सामन्यात टीम इंडियाला टिकवून ठेवण्यासाठी धावांचा वेग कायम ठेवण्याचे काम केले. हे सर्व मिळून चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्कोअर 3 गड्यांच्या मोबदल्यात 164 पर्यंत पोहोचला. रहाणे आणि कोहली यांनी आतापर्यंत चौथ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली आहे. टीम इंडियाला आता 5व्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज होती.
शेवेच्या दिवशी भारताची सुरुवात निराशाजनक झाली विराट कोहली आणि रवींद्र जडेजा लागोपाठ बाद झाले . त्यानंतर राहणे आणि श्रीकर भरत ने डाव सावरण्याचा प्रेयत्न केला. परंतु तर काही खास करू शकले नाही. जेवणाच्या वेळेच्या आगोदरच भारतीय संघ 234 धावा करून ऑल आऊट झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने हा सामना 209 धावांची जिंकला. पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचे भारतचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.