WTC Final 2023: ऑस्ट्रेलियन संघाने केले बॉल टेम्परिंग? जाणून घ्या या दाव्यामागील संपूर्ण सत्य…
WTC Final 2023, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याबाबत पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू बासित अलीने ऑस्ट्रेलियन संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचा मोठा आरोप केला आहे. बासित अलीच्या म्हणण्यानुसार, कांगारू संघाने 15 व्या षटकाच्या जवळ चेंडूशी छेडछाड केली आणि त्यामुळेच भारताने दोन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. भारतीय संघ, सामना अधिकारी आणि समालोचकांनी याची दखल न घेतल्याबद्दल अलीने आश्चर्य व्यक्त केले.(wtc-final-2023-former-pakistani-cricketer-basit-ali-has-accused-the-australian-team-for-ball-tampering-india-vs-australia)
आपल्या यूट्यूब चॅनलवर या सामन्याबद्दल बोलताना बासित अली म्हणाले की, भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान 16 ते 18 षटकांमध्ये बॉल टॅम्परिंग झाल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. डावाच्या 18व्या षटकात पंच रिचर्ड केटलबरो यांनी चेंडूचा आकार बदलून तो बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर नवीन चेंडू घेण्यात आला. येथून 30 धावांवर 2 विकेट गमावणाऱ्या भारतीय संघाने 71 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. पंचांना या सर्व गोष्टी दिसत नाहीत का?
#balltampering crepe band to wipe the ball, umpire supervision needed while using any cloth to wipe the ball? pic.twitter.com/wM38i3ESF6
— SKV (@skvis45) June 10, 2023
अली पुढे म्हणाला की, मला आश्चर्य वाटते. बीसीसीआय एवढं मोठं बोर्ड आहे आणि त्यांना ते दिसत नाही का? यावरून तुमचे लक्ष क्रिकेटकडे नसल्याचे दिसून येते. भारताने अंतिम फेरी गाठल्याने तुम्ही आनंदी आहात. 15-20 षटकांनंतर कोणताही ड्यूक्स चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही आणि तो सुमारे 40 षटकांचा असतो.
पुजारा आणि कोहलीच्या विकेट्सचा उल्लेख केला
या व्हिडिओमध्ये बासित अलीने चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या विकेट्सचा उल्लेख केला आहे. यामध्ये पुजारा बॉल सोडताना बोल्ड झाला. ग्रीनच्या या चेंडूची साईन साईड पुजाराच्या दिशेने होती आणि चेंडू वेगाने आतमध्ये आला.दुसरीकडे ज्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला तो चेंडू अचानक खूप वेगाने उसळला.