IND vs ENG : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचा (WTC 2027) भाग असणारी भारत आणि इंग्लंडमधील (IND vs ENG 2025) पाच कसोटी सामन्यांची मालिकेची सुरुवात उद्या (20 जून) पासून होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या (Leeds) मैदानात 20 जूनपासून सुरु होणार आहे. या महत्वाच्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा एक स्टार फलंदाज सरावादरम्यान जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय संघात तब्बल 8 वर्षांनंतर कमबॅक करणारा करुण नायर सरावादरम्यान (Karun Nair Injury) जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सरावादरम्यान करुण नायरला बरगडीला दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला सराव पूर्ण करता आला नाही. मात्र त्याची दुखापत किती गंभीर आहे. याबाबात बीसीसीआयकडून (BCCI) कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तो उद्यापासून सुरु होणारा पहिला कसोटी सामना खेळणार की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
इंग्लंड लायन्यविरुद्ध शानदार फलंदाजी
करुण नायरने नुकताच इंग्लंड लायन्यविरुद्ध झालेल्या दोन सामन्यात शानदार फलंदाजी करत गोलंदाजांना घाम फोडले होते. त्याने दोन सामन्यात 259 धावा केल्या आहेत. सध्या तो शानदार फॉर्मात असल्याने भारतीय संघाला मालिकेपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ के. एल. राहुलला टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीची संधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, असा समाज निर्माण होईल, भाषा वादात अमित शहांचे मोठे विधान
तर कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदा भारतीय संघ कसोटीमध्ये मैदानात उतरणार आहे.