Download App

IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत भारताचा शानदार विजय; बुमराह आणि जैस्वाल ठरले हिरो

  • Written By: Last Updated:

IND Vs ENG : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहने 9 विकेट घेतल्या.

या सामन्यात 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ 292 धावांवरच संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने 73 धावांचे योगदान दिले, यात 8 चौकार आणि 1 षटकार होता. याशिवाय एकाही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, त्यामुळे त्यांचा 106 धावांनी पराभव झाला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. यात यशस्वी जैस्वालने 209 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, त्यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मात्र, याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेला इंग्लंड केवळ 253 धावांत गारद झाला. भारताकडे 143 धावांची आघाडी होती. यानंतर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा फलकावर लावल्या. इंग्लिश संघाला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले. बुमराह, अश्विनच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना हे लक्ष गाठता आले नाही. सामना चौथ्या दिवशीच संपला.

बुमराह, अश्विनची भेदक गोलंदाजी
399 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुबळा दिसत होता. डावाची सुरुवात चांगली झाली होती. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. यानंतर जॅक क्रॉली आणि रेहान अहमद यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 21.5 षटकांत 95 धावांत 2 विकेट गमावल्या. संघाला पहिला धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, त्याने 6 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. याशिवाय दुसरा धक्का रेहान अहमदच्या रूपाने बसला, ज्याने 5 चौकारांसह 23 धावा केल्या.

‘अभिषेक माझा गौरव’ लेकाला पुरस्कार मिळाल्यानंतर बिग बींनी केले तोंडभरून कौतुक

यानंतर जॅक क्रॉलीने ऑली पोपसोबत तिसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली, 29 व्या षटकात पोप बाद झाला. पहिल्या सामन्यात 196 धावांची खेळी खेळणाऱ्या ओली पोपला 5 चौकारांच्या मदतीने केवळ 23 धावा करता आल्या. यानंतर रूटच्या रूपाने चौथी विकेट गमावली. रुटने 10 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडला पाचवा झटका जॅक क्रॉलीच्या रूपाने बसला, त्याने 132 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या.

इंग्लंडची पाचवी विकेट 42 व्या षटकात पडली. यानंतर संघाला 43व्या षटकात जॉनी बेअरस्टोच्या रूपाने सहावा धक्का बसला. बेअरस्टो 36 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर काही वेळाने कर्णधार बेन स्टोक्स धावबाद झाला. स्टोक्सला 29 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने केवळ 11 धावा करता आल्या.

Sonali Kulkarni : सोनालीने शेअर केला ‘मलाइकोट्टाई वालिबान’मधील लूक

त्यानंतर बेन फॉक्सच्या रूपाने संघाने 8वी विकेट गमावली. फॉक्सने 69 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 36 धावा केल्या. यानंतर इंग्लंडची 9वी विकेट शोएब बशीरच्या रूपाने आणि 10वी विकेट टॉम हार्टलीच्या रूपाने पडली. बशीर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तर हार्टलेने 47 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 36 धावा केल्या.

यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने 3-3 विकेट घेतल्या. याशिवाय मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Pragya Kapoor: चित्रपट निर्मात्या प्रग्या कपूर हिने लाँच केला इको-फ्रेंडली फॅशन ब्रँड

follow us