IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG Test) उद्यापासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे. या सामन्याआधी टीम इंडियातील रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या (Team India) अडचणी वाढलेल्या असतानाच आता इंग्लंडलाही दोन मोठे धक्के बसले आहेत. संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज जॅक ली दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो. तसेच हॅरी ब्रूक या खेळाडूने वैयक्तिक कारणांमुळे या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. जॅक ली दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
IND vs ENG : बीसीसीआयने वजनावरून हिणवलेला सर्फराज अखेर टीम इंडियात ! संघात दोन मोठे बदलही
जॅक लीच हा संघातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. लीचला सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला त्रास जाणवत होता. अशा परिस्थितीत तो आता दुसरा सामना खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसऱ्या कसोटीआधी सरावासाठीही तो उपस्थित नव्हता. तर दुसरीकडे हॅरी ब्रूकनेही कसोटी मालिकेतून माघार घेत मायदेशाची वाट धरली आहे. या दोन खेळाडूंच्या जागी कुणाला संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.
टीम इंडियालाही दोन धक्के, जडेजा-राहुल बाहेर
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. आता या दोघांच्या जागी कुणाला संधी द्यायची असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा ठाकला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जागी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या तिघांना संधी मिळाली आहे. परंतु, या तिघांपैकी प्रत्यक्षात मैदानात कोण दिसेल हे अद्याप निश्चित नाही.
Virat Kohli : विराट ठरला ‘वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला पछाडले