IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून (IND Vs ENG) सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. टीमचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याची फिटनेस अपडेट समोर आली आहे. ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त होऊन तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे गायकवाड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकला नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. ऋतुराज गायकवाड या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, “ऋतुराज गायकवाड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे. ऋतुराज सात ते दहा दिवसांनी तंदुरुस्त होईल.
यानंतर ऋतुराज महाराष्ट्राकडून रणजीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होईल आणि या सामन्यातून फिटनेस सिद्ध करेल. दुसऱ्या कसोटीनंतर ऋतुराजची राष्ट्रीय संघात निवड होऊ शकते.
Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; पाकिस्तानकडून तीन प्रशिक्षकांची सुट्टी!
अभिमन्यूला संधी मिळेल
ऋतुराज गायकवाडला अद्याप कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेली नाही. पण ऋतुराज गायकवाड एकदिवसीय आणि टी-20 मध्ये टीम इंडियाच्या महत्त्वाचा भाग बनत आहे. गायकवाडने आत्तापर्यंत भारतासाठी 6 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत.
IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न…
तर कसोटी मालिकेत भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात. पहिल्या दोन सामन्यांमध्ये बॅकअप सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरनला संधी दिली जाऊ शकते. ईश्वरन यापूर्वी इंग्लंडमध्ये बॅकअप सलामीवीर संघाचा भाग होता. इंग्लंडविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्यासाठीही अभिमन्यूला भारत अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यातही भारत अ संघाची जबाबदारी ईश्वरनकडेच राहणार आहे.