Download App

…तर भारतीय संघ करणार थेट फायनलमध्ये एंट्री, ICC कडून मोठी घोषणा

IND vs ENG T20 World Cup 2024 : आज भारतीय संघ (Team India) इंग्लड (England) विरोधात T20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) दुसरा 

  • Written By: Last Updated:

IND vs ENG T20 World Cup 2024 : आज भारतीय संघ (Team India) इंग्लड (England) विरोधात T20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) दुसरा  उपांत्य सामना खेळणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, गयानामध्ये (Guyana) आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे हा सामना वाहून जाण्याचा धोका आहे. जर असं झालं तर भारतीय संघ थेट T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात प्रवेश करू शकतो.

T20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना आज गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर (Providence Stadium) होणार आहे मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्याच बरोबरताशी 10 ते 15 मैल वेगाने वारे वाहू शकतात. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तर दुसरीकडे AccuWeather.com ने दिलेल्या माहितीनुसार, गयानामध्ये सकाळच्या वेळी पावसाची 90% शक्यता आहे.  भारत विरुद्ध इंग्लंड सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषक 2024 चा दुसरा सेमीफायनल सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे किंवा रद्द देखील होऊ शकते.

आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही निकालासाठी T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात दोन्ही संघांना किमान 10 षटके खेळावी लागणार आहे. मात्र जर हा सामना रद्द झाला तर सुपर 8 टप्प्यातील आपापल्या ग्रुपमधील अव्वल स्थानी असलेले संघ अंतिम फेरीत जातील. त्यामुळे जर हा सामना रद्द झाला तर भारतीय संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. कारण भारतीय संघ सुपर 8 टप्प्यातील आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी होतो. जर असं झालं तर अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार.

जाणून घ्या कशी असणार प्रोव्हिडन्स स्टेडियमची खेळपट्टीग

गयाना प्रॉव्हिडन्स नॅशनल स्टेडियममधील खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. ज्याचा पूर्ण लाभ भारतीय संघाला होऊ शकते. याचा मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाकडे रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यासारख्या जबरदस्त फिरकी गोलंदाज आहे.

मोबाईल यूजर्स, 1 जुलैपासून सिमकार्डबाबतचे ‘हे’ नियम बदलणार, जाणून घ्या सर्वकाही

follow us

वेब स्टोरीज