Download App

टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींमधून विराटची माघार, काय आहे कारण?

IND Vs ENG : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohali) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली होती. आता त्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. बीसीसीआय लवकरच त्याच्या रिप्लेस खेळाडूची घोषणा करेल.

कोहलीने इंग्लंडविरुद्ध 42.36 च्या सरासरीने 1991 कसोटी धावा केल्या आहेत. तो शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेत खेळला होता. वैयक्तिक कारणांमुळे इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकणार नाही. विराटची माघार भारतासाठी मोठा धक्का आहे.

Sonali Bendre : ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट ड्रेसमध्ये सोनाली बेंद्रे, ग्लॅमरस लुक्सवर चाहते फिदा!

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कोहली हा भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताकडे श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला एक एक स्थान वर खेळावे लागणार आहे. केएस भरत किंवा ध्रुव जुरेलकडे विकेटकीपरचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. रजत पाटीदारलाही संघात संधी दिली जाऊ शकते. रजतने अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या सराव सामन्यात आणि चार दिवसीय सामन्यात इंग्लंड लायन्सविरुद्ध शतकं झळकावली होेती.

श्वेता शिंदेचा हिरव्या साडीतील मोहक अंदाज, दिलखेच अदांनी चाहते घायाळ

दुसरीकडे, मुंबईचा फलंदाज सर्फराज खानचा देखील विचार केला जाऊ शकतो. चेतेश्वर पुजारालाही पुन्हा संधी मिळू शकतो. त्याने रणजी ट्रॉफी हंगामाची सुरुवात झारखंडविरुद्ध द्विशतकाने केली होती. आता पहिली कसोटी 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये तर दुसरी कसोटी 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज