IND vs GBR 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) नवव्या दिवशी उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला (IND vs GBR 2024) पराभव करत ऑलिम्पिक 2024 च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये या सामन्याचा निर्णय झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने 4-2 ने ब्रिटनचा पराभव करत पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी देखील टोकियोमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनचा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता.
या सामन्याच्या पहिल्या क्वार्टर भारतीय संघाला आणि ब्रिटन 3-3 पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र दोन्ही संघाना त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. तर या सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला भारताला मोठा धक्का बसला होता. अमित रोहिदासने ब्रिटनच्या खेळाडूला दुखापत केल्याने पंचांनी अमित रोहिदासला रेड कार्ड दिले होते. त्यामुळे या संपूर्ण सामन्यात भारतीय संघ दहा खेळाडूवर खेळत होता.
अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) सामन्याच्या 22व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली मात्र त्यानंतर 27व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने या सामन्यात कमबॅक करत बरोबरी साधली. त्यानंतर 36व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. भारतीय गोलकिपर श्रीजेशने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत दोन्ही पेनल्टी कॉर्नर सेव्ह केले. यामुळे तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारत किंवा ब्रिटन या दोघांनाही गोल करता आला नाही.
🇮🇳🔥 𝗪𝗛𝗔𝗧 𝗔 𝗪𝗜𝗡! The Indian men’s hockey team secured a fantastic victory in a shoot-out thriller to book their place in the semi-final and move one step closer to Olympic glory.
🏑 A red card for Amit Rohidas in the second quarter threatened to change the momentum of… pic.twitter.com/u0sTZ8Dket
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 4, 2024
‘केज’साठी पवारांनी हेरलाय भाजपचाच शिलेदार; माजी आमदार ठोंबरे ‘राष्ट्रवादी’च्या वाटेवर..
चौथ्या क्वार्टरमध्ये श्रीजेशने भारतासाठी गोलकीपिंगमध्ये शानदार कामगिरी करत ब्रिटनचे अनेक पेनल्टी कॉर्नर सेव्ह केले. चौथ्या क्वार्टरमध्ये देखील दोन्ही संघाना गोल करता न आल्याने या हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनकडून जेम्स अल्बेरीने पहिला गोल केला तर भारताकडून हरमनप्रीतने पहिला गोल केला. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने 4-2 ने ब्रिटनचा पराभव करत दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली.