IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा… ‘या’ खेळाडूला मिळणार कर्णधारपद

IND vs IRE:  भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंड मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. तर हार्दिक पांड्या आयर्लंडला जाणार नाही. जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वृत्तसंस्था ‘एएनआय’ने […]

WhatsApp Image 2023 07 28 At 3.35.47 PM

WhatsApp Image 2023 07 28 At 3.35.47 PM

IND vs IRE:  भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंड मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. तर हार्दिक पांड्या आयर्लंडला जाणार नाही.

जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वृत्तसंस्था ‘एएनआय’ने बीसीसीआय सचिवांच्या हवाल्याने म्हटले आहे. याशिवाय जय शाहने असेही सांगितले की, तो आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. (ind vs ire team india may be announced soon for ireland series jasprit bumrah will get the captaincy)

बुमराह आयर्लंड मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो

आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार असेल, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुष्टी केली आहे की बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून तो आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. यामुळे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार बुमराह असेल हे स्पष्ट झाले आहे.

हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांना विश्रांती मिळेल

वृत्तानुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आशिया कपच्या तयारीसाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर आठवडाभराच्या शिबिराचा सल्ला दिला आहे. दरम्यान, 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्या आशिया कपच्या तयारी शिबिरात असू शकतो आणि त्याच्या जागी दुसरा खेळाडू आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवू शकतो.

IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर

यापूर्वी हा खेळाडू कर्णधार झाल्याची बातमी आली होती

यापूर्वी, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, टी-20 संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यामागचे कारण असेही सांगण्यात आले की, जर श्रेयस अय्यर तंदुरुस्त झाला तर सूर्याला आशिया चषक संघात स्थान मिळणे कठीण होईल, कारण यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे.

Exit mobile version