Download App

India vs New Zealand : हार्दिक पांड्याच्या जागी कोणाला मिळणार संधी? ‘या’ नावांची चर्चा

  • Written By: Last Updated:

Hardik Pandya India vs New Zealand: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला मोठा फटका बसला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जखमी झाल्यानं टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढलं. कारण हा सामना न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना आहे. हा सामना भारताची पुढची वाटचाल ठरवणार आहे. दरम्यान, हार्दीक जमखी झाल्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी कोण खेळणार हा प्रश्न आहे.

Vivek Agnihotri यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले, महाभारतावर 3 सिनेमा बनवण्याचा निर्धार’ 

वास्तविक, न्यूझीलंड 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत हार्दिकच्या जागी संघात कोणाचा समावेश करायचा, याबाबत भारताला बारकाईने विचार करून निर्णय घ्यावा लागेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना धर्मशाला येथे होणार आहे. धर्मशाळामधील खेळपट्टी गोलंदाजांना मदत करते आणि फलंदाजही येथे चांगली फलंदाजी करू शकतात. अशा स्थितीत हार्दिकच्या जागी फलंदाजाला उतरवायचे की शमीला संधी द्यायची या संभ्रमात संघ व्यवस्थापन आहे.

कोणत्या नावांची चर्चा ?
हार्दिक पांड्या हा अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडूलाच संधी मिळू शकते, असे मत व्यक्त होत आहे. आर अश्विन त्यासाठी योग्य ठरू शकतो. आर अश्विन गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही पारंगत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच यावर विचार होण्याची शक्यता आहे.
धर्मशाला खेळपट्टी पाहून संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला, तर न्यूझीलंडविरुद्ध शमीला (मोहम्मद शमी) संधी मिळण्याची देखील शक्यता आहे. शमीला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

ईशान की सूर्यकुमार यादव?
हार्दिकच्या जागी इशान किशनचीही संघात येण्याची शक्यता आहे. तर सूर्याला अद्याप संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत टीम मॅनेजमेंट हार्दिक ऐवजी बॅट्समन सोबत जाते की बॉलर सोबत जाते हे पाहावे लागेल. वास्तविक, हार्दिक सारखी गोलंदाजी करणारा शार्दिल आधीच संघात आहे, पण फलंदाजीत शार्दुलची जादू अजून दिसलेली नाही.

शार्दुल हा मोठा सामनावीर आहे- रोहित शर्मा

नुकताच एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यात रोहित शार्दुलबद्दल बोलत आहे, ज्यामध्ये शुभमन गिल कॅप्टन रोहितसोबत शार्दुलच्या बॅटिंगबद्दल विनोद करत आहे, ज्यावर कॅप्टन रोहितने प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले की शार्दुल एक मोठा मॅच प्लेयर आहे. त्याला फलंदाजीतही संधी मिळेल. रोहित आणि शुभमन यांच्यातील हा विनोद भारतीय चाहते एक संकेत म्हणून घेत आहेत.

Tags

follow us