IND vs PAK : T20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) लीग सामन्यात भारतीय संघाने (Team India) शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला होता. या सामन्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत- पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना पाहायला मिळणार आहे.
आयसीसीने (ICC) पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy 2025) आयोजन केले आहे. या स्पर्धेत भारतीय संघ देखील भाग घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक तयार केले आहे. पीसीबीने तयार केलेल्या या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार आहे. त्यामुळे T20 विश्वचषक 2024 नंतर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे.
या वेळापत्रकानुसार पाकिस्तानमध्ये 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे तर फायनलसाठी 10 मार्च रिजर्व डे म्हणून ठेवण्यात आला आहे. मात्र अद्याप या वेळापत्रकाला बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसीने मंजुरी दिली नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
पीसीबीने (PCB) तयार केलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान दरम्यान 1 मार्च रोजी लाहोरमध्ये सामना होणार आहे. आतापर्यंत पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्कवी यांनी 15 सामन्यांचे वेळापत्रक सादर केले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळणार आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने लाहोरमध्ये, तीन सामने कराची आणि पाच सामने रावळपिंडीमध्ये होणार आहे.
याच बरोबर पहिला सेमी फायनल कराचीमध्ये आणि दुसरा सेमी फायनल रावळपिंडीत होणार आहे. तर या स्पर्धेचा फायनल सामना लाहोरमध्ये होणार आहे. मात्र जर भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तर सेमी फायनल सामना लाहोरमध्ये होणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे.
Zika Virus : सावध राहा, महाराष्ट्रात वाढत आहे झिका व्हायरस, जाणून घ्या लक्षणे
असे असणार ग्रुप
पीसीबीने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश असणार आहे तर बी ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा समावेश असणार आहे. मात्र अद्याप या वेळापत्रकाला बीसीसीआय आणि आयसीसीने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता देखील आहे.