IND vs PAK, T20 World Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये एक हाय व्होल्टेज सामना झाला. यामध्ये टीम इंडियाने अखेर बाजी मारली. टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकत आपला दणदणीत विजय साजरा केला. (India vs Pakistan) दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यातील विजयासह टीम इंडिया आता पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा? IND vs ENG : इंग्लंडचा फलंदाज सचिनलाही भारी; फक्त 29 धावा केल्या अन् बनला नंबर वन
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर म्हणाला, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मला वाटले की आम्ही 10 षटकांनंतर चांगल्या स्थितीत आहोत, नंतर आम्ही 15-20 धावांनी मागे राहिलो. पण तरीही गोलंदाजांनी त्यांचं काम केलं आहे.
खेळपट्टीबाबत तो पुढे म्हणाला की, ही विकेट आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या विकेटपेक्षा चांगली होती. जेव्हा फलंदाजी करताना पाकिस्तानचा अर्ध्या डाव संपला, तेव्हा आम्ही सर्व खेळाडूंना बोलावलं आणि म्हणाले की जर हे आपल्या बाबतीत घडू शकतं तर ते त्यांच्यासोबत देखील होऊ शकते.
बुमराहबाबत मोठे वक्तव्य
रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबद्दल सांगितलं की, जसप्रीत बुमराह चांगली कामगिरी केली. तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. त्याने या वर्ल्ड कपच्या शेवटपर्यंत त्याच मानसिकतेत राहावं अशी आमची इच्छा आहे, तो चेंडू टाकण्यात हुशार आहे असही रोहीत म्हणाला.
चाहत्यांबद्दल विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, गर्दी विलक्षण होती, त्यांनी कधीही निराश केलं नाही, आम्ही जगात कुठेही खेळलो तर चाहते मोठ्या संख्येने येतात. आणि आम्हाला साथ देतात. ही फक्त स्पर्धेची सुरुवात आहे, आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.