IND vs ENG : इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज सचिनलाही भारी; फक्त 29 धावा केल्या अन् बनला नंबर वन

IND vs ENG : इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज सचिनलाही भारी; फक्त 29 धावा केल्या अन् बनला नंबर वन

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिला (IND vs ENG) कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तरी देखील भारतीय खेळपट्ट्यांवर पहिल्याच दिवशी 200 पेक्षा जास्त धावा करण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. या सामन्यात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने (Joe Root) एक विक्रम आपल्या नावे केला. पहिल्याच कसोटी सामन्यात जो रूटने इतिहास रचला. पहिल्या डावात त्याला फक्त 29 धावाच करता आल्या मात्र तरीही त्याने भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे रेकॉर्ड मोडीत काढले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या आतापर्यंतच्या सर्व कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. आता मात्र जो रूटने नवा विक्रम करत सचिनला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने एकूण 32 कसोटी सामन्यात 53 डावांत 2535 धावा केल्या होत्या. आता जो रुट याही पुढे गेला आहे. भारताविरुद्धच्या 27 कसोटी (Team India) सामन्यात जो रूटने एकूण 2536 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 9 शतकांचाही समावेश आहे. या नव्या विक्रमानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो प्रथम फलंदाज ठरला आहे.

IND vs ENG : रविचंद्रन अश्विन अन् रवींद्र जडेजानं रचला इतिहास, ‘या’ फिरकीपटूंच्या नावावर अनोखा विक्रम

विराट कोहली (Virat Kohli) आघाडीच्या 5 खेळाडूत आहे. परंतु, त्याला जो रूटचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 600 धावांची गरज आहे. या धावा एकाच मालिकेत करणे शक्य नाही. त्यातही पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. मालिकेआधी विराट कोहलीने बीसीसीआयकडे विनंती केली होती. त्याची विनंती मान्य करण्यात आली होती. विराटच्या जागी रजत पाटीदार (Rajat Patidar) याची निवड करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष सामन्यात त्याला संधी मिळाली नाही.

दरम्यान,  बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले होते की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली होती. आता त्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. बीसीसीआय (BCCI) लवकरच त्याच्या रिप्लेस खेळाडूची घोषणा करेल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) चेतेश्वर पुजाराकडे दुर्लक्ष करत रजत पाटीदार याला संधी दिली.

Virat Kohli: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराटने घातली भलतीच जर्सी, नेमकं काय घडलं?

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज