IND vs ENG : ठरलं तर! विराच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी, पुजारा-जुरेलसाठी ‘बॅडलक’
IND vs ENG Test Series : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच विराटच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. ध्रुव जुरेल, केएस भरत किंवा चेतेश्वर पुजारा या तिघांपैकी एकाला संधी मिळेल असे सांगितले जात होते. मात्र, या तिघांनाही डावलून स्टार खेळाडू रजत पाटीदारला (Rajat Patidar) संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघात पहिला कसोटी सामना उद्यापासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. त्याआधी एक दिवस विराटच्या बदली खेळाडूची घोषणा बीसीसीआयने केली आहे. चेतेश्वर पुजारा अलीकडेच रणजीमध्ये 243 धावांची खेळी केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे. त्यामुळे त्याला विराटच्या जागी संधी मिळेल असे सांगितले जात होते. तसेच केएस भरत आणि ध्रुव जुरेल या दोघांच्या नावाची चर्चा होती. मात्र, या सगळ्यांना डावलून संघ व्यवस्थापनाने रजत पाटीदारला संधी दिली.
IND vs ENG : विराटच्या जागी कोण? ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा; BCCI लवकरच करणार घोषणा
टी 20 क्रिकेट लीगमधील राजस्थानच्या संघातील खेळाडू ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याची भारतीय संघाच प्रथमच निवड झाली आहे. त्यामुळे आता त्याला पदार्पणाची संधी मिळेल असे सांगितले जात होते. कारण पहिल्या दोन कसोटींसाठी त्याची निवड झाली आहे. आता फक्त अंतिम अकरा खेळाडूत निवड होणे बाकी होते. त्यानंतर केएस भरत याचीही दावेदारी मजबूत मानली जात होती. भारत अ आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या सामन्यांचा विचार केला तर केएस भरतने शतक झळकावले आहे. त्यामुळे त्याची दावेदारी अधिक मजबूत झाली होती. त्यामुळे विराट कोहलीच्या गैरहजेरीमुळे दोघांतील एकाला संधी मिळू शकते अशी चर्चा होती. मात्र या दोघांनाही संघात जागा मिळू शकली नाही.
दरम्यान, बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले होते की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली होती. आता त्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. बीसीसीआय (BCCI) लवकरच त्याच्या रिप्लेस खेळाडूची घोषणा करेल.
Virat Kohli: एका शतकासाठी विराटने 1019 दिवस वाट पाहिली, 315 दिवसांत झळकावली 8 शतके