Download App

IND vs SA 2nd Test : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; ‘या’ स्टार खेळाडूचा पत्ता होणार कट?

IND vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आजपासून (बुधवार) दुसरा कसोटी (IND vs SA 2nd Test) सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील मैदानावर दुपारी दोन वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे आता हा शेवटचा कसोटी सामना जिंकून बरोबरी करण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे. या सामन्यात भारतीय संघात काही बदल पहायला मिळतील.

पहिल्या कसोटीत शुभमन गिल (Shubman Gill) अपयशी ठरला होता. त्याला फक्त 26 धावा करता आल्या होत्या. वेस्टइंडिज दौऱ्यातही तो फ्लॉप ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतून त्याला डच्चू मिळण्याची शक्यता जास्त वाटत आहे. जर त्याला संधी मिळाली नाही तर त्याच्याजागी अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran या नवोदित फलंदाजाला संधी मिळू शकते. तसं पाहिलं तर ऋतुराज गायकवाड (Rururaj Gaikwad) दुखापतग्रस्त झाल्याने अभिमन्यूला दक्षिण आफ्रिकेत  (South Africa) येण्यास सांगितलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात अभिमन्यूची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 89 सामन्यात 22 शतकं केली आहेत. त्याच्या या कामगिरीचा विचार करूनच त्याला संघात संधी मिळू शकते.

IND vs SA Test : आफ्रिकेला दुसरा धक्का! बावुमानंतर ‘या’ खेळाडूची दुसऱ्या कसोटीतून माघार

दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जर पाऊस बराच वेळ सुरू राहिला तर कदाचित सामना रद्दही करावा लागू शकतो. तसेच मैदानाच्या खेळपट्टीबाबत बोलायच झाले तर खेळपट्टीवर गवत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. नाणेफेक जिंकणारा संघ सुरुवातीला गोलंदाजी घेईल अशी शक्यता आहे.

संभाव्य भारतीय संघ 

या सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, सिरार, जसप्रित बुमराह आणि मुकेश कुमार हे खेळाडू असू शकतील.

IND vs SA:आफ्रिकेसमोर फलंदाजांचे सपशेल लोटांगण ! पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव

संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ 

दक्षिण आफ्रिका संघा टोनी डी जोरजी, डीन एल्गर, एडेन मार्कराम, कीगन पीटरसन, डेविड बेडिंघम, वियान मुल्डर, काइल वेरिन, मार्को जेनसन, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झी आणि नांद्रे बर्गर हे खेळाडू असू शकतील.

follow us